Raigad politics News: आमदार महेंद्र थोरवनी दिलेला शब्द पाळला! भाजपाचा उपनगराध्यक्ष व १ स्वीकृत नगरसेवक (फोटो-सोशल मीडिया)
Raigad politics News: रायगड जिल्ह्यातील खोपोली नगरपरिषदेची उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकच्या पदाची निवडणूक झाली असून निवडून आलेल्या उमेदवारांनुसार शिवसेना (शिंदे गट) एक, भाजप एक व राष्ट्रवादी (अजित पवार गट) पक्षाचा एक असे तीन स्वीकृत नगरसेवक बिनाविरोध निवडून आले तर शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी महायुती म्हणून दिलेला शब्द पाळत भाजपाचा उपनगराध्यक्ष बिनाविरोध निवडून आला. खोपोली नगरपरिषदेत थेट नगराध्यक्ष पदी महायुतीचे शिवसेनेचे कुलदीपक शेंडे निवडून आले होते. तर ३१ नगरसेवकपैकी १४ शिवसेनेचे व ४ भाजपाचे, ७ राष्ट्रवादीचे, ४ शेकाप पक्षाचे, १ शरद पवारांच्या राष्ट्रवादी व १ अपक्ष असे नगरसेवक निवडून आले.
हे देखील वाचा: Raigad ZP employee benefit: एसबीआयने रायगड जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांसाठी खुल्या केल्या विशेष फायदे
भाजप, शिवसेना व रिपाई महायुती मिळून स्पष्ट बहुमत मिळाले असल्याने निवडणुकीत आधी ठरल्या प्रमाणे उपनगराध्यक्ष पद भाजपाला देण्यात आले. त्यानुसार भाजपाचे तरुण नगरसेवक विक्रम यशवंत साबळे यांची बिनाविरोध निवड झाली. महायुतीला दोन स्वीकृत नगरसेवक मिळणार होते. त्यानुसार शिवसेनेकडून खोपोली उपशहरप्रमुख दिनेश थोरवे यांचा एकमेव अर्ज दाखल केला. गेली अनेक वर्षे राजकीय व सामाजिक कामाच्या जोरावर दिनेश थोरवे यांना हा बहुमान मिळाल्याचे बोलले जात आहे व भाजपाकडून खोपोली शहर महिला अध्यक्ष असणाऱ्या अश्विनी अत्रे यांची बिनविरोध निवड झाली.
हे देखील वाचा: Karjat News : भिवपुरी कारशेडच्या कामात २२ कोटी बुडवल्याचा आरोप; किरण ठाकरे यांची महसूल मंत्र्यांकडे तक्रार
महायुतीतर्फे छोटेखानी मिरवणुकीने आनंद साजरा केला. या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने सात नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीने बेट नगराध्यक्ष पदी पराभव आलेल्या सुनील पाटील यांना उमेदवारी देत त्यांना प्रवाहात ठेवण्याचे काम केले आहे, त्यांचा ही एकमेव अर्ज असल्यामुळे ते ही बिनविरोध निवडून आले आहेत, निवडी नंतर महायुतीतर्फे छोटेखानी मिरवणूक काढीत वाजता गाजत आनंद व्यक्त केला. ढोल ताश्याच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी करीत मोठा जल्लोष साजरा केला.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.






