राज ठाकरे आणि पत्नी शर्मिला यांची लव्ह स्टोरी (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा असणारे आणि ठाकरे घराण्याचे नाव रोशन करणारे राज ठाकरे हे दमदार व्यक्तीमत्त्व असून त्यांच्या भाषणाचे अनेक चाहते आहेत. राज ठाकरे यांचा 14 जून रोजी वाढदिवस असतो आणि यानिमित्ताने त्यांची सहचारिणी शर्मिला वाघ-ठाकरे यांच्यासह त्यांचे सूत कसे जुळले याबाबत नक्कीच आपण जाणून घेऊया.
अनेकांना त्यांच्या लव्ह स्टोरीविषयी जाणून घेण्याची उत्सुकता आहे आणि याबाबत ABP माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये खुद्द पत्नी शर्मिला ठाकरे यांनी खुलासा केला होता. नक्की काय म्हणाल्या होत्या शर्मिला जाणून घ्या (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
कुठे आणि कशी झाली भेट
शर्मिला वाघ या प्रसिद्ध छायचित्रकार आणि नाट्यदिग्दर्शक मोहन वाघ यांची मुलगी असून रूपारेल कॉलेजमध्ये त्यांचे शिक्षण झाले आहे आणि महत्त्वाचे म्हणजे राज ठाकरे यांची बहीण आणि शर्मिला या दोघी घनिष्ठ मैत्रिणी आणि या लव्ह स्टोरीला इथूनच सुरूवात झाली. शर्मिला आणि राज एकमेकांना ओळखत होते मात्र पहिल्यांदा रूपारेलच्या कट्ट्यावर त्यांची एका कॉमन मित्राद्वारे भेट झाली आणि मग सुरू झाला प्रेमाचा सिलसिला.
कट्ट्यावर झाली भेट
रूपारेल कॉलेजमधून उत्तीर्ण झाल्यानंतर शर्मिला नोकरी करत होत्या आणि एका रविवारी मित्रमैत्रिणींना भेटायला कट्ट्यावर गेल्या होत्या आणि तिथेच राज ठाकरेही आले होते असे त्यांनी या मुलाखतीत सांगितले. राज आणि शर्मिला यांचे कॉमन मित्र शिरीष पारकर यांनी या दोघांची ओळख करून दिली आणि तेव्हापासूनच ‘राज माझ्यामागे होता’ असं मजेशीर व्यक्तव्य शर्मिला यांनी केले. इतकंच नाही तर ‘राज आता मान्य करणार नाही पण तोच माझ्या मागे लागला होता’ असंही त्यांनी या मुलाखतीदरम्यान सांगितले होते
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे एकत्र येणार? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मला…
लँडलाईनवर गप्पा
मैत्रीचे प्रेमात कधी रुपांतर झाले दोघांनाही कळलं नाही आणि राज आणि शर्मिला हे त्यावेळी वेळ ठरवून लँडलाईनवर तासनतास गप्पा मारायचे. तर आपण व्यवस्थित वेळ ठरवून बोलत असल्यामुळे घरी काही अडचण आली नाही अथवा राज ठाकरेंना कधी मुलीच्या आवाजात बदलून फोन करण्याची वेळ आली नाही असंही त्यांनी आवर्जून सांगितले.
दोन वर्षांनी मोठ्या शर्मिला
राज ठाकरे जेव्हा शर्मिला यांच्या प्रेमात पडले तेव्हा शर्मिला या त्यांच्यापेक्षा दोन वर्षानी मोठ्या होत्या मात्र या गोष्टीचा त्यांच्या नात्यात कधीही अडथळा आला नाही. शर्मिला यांचे वय मोठे असल्याने तिच्या बाजूने लग्नाचा विचार पहिल्यांदा करण्यात आला आणि इतकंच नाही तर त्या दोघांनी लवकर लग्न केले आणि लगेचच अमित ठाकरे यांचा जन्म झाला तेव्हा राज खूपच लहान दिसायचा असंही शर्मिला यांनी सांगितले. महत्त्वाचं म्हणजे शर्मिलाच्या वडिलांनीही राज लहान असल्याचे माहीत नव्हते.
MNS BJP Alliance: राज ठाकरेंसाठी हा सौदा फायद्याच्या की तोट्याचा; काय आहेत राजकीय समीकरणे?
विरोध झालाच नाही
राज ठाकरे आणि शर्मिला वाघ यांचं लग्न लगेच जमले. कारण बाळासाहेब ठाकरे आणि मोहन वाघ यांची घनिष्ठ मैत्री असल्याने कुठेही विरोध व्हायचा प्रश्नच आला नाही असे राज ठाकरे यांनी मुलाखतीमध्ये सांगितले. त्यामुळे घरी सांगितल्यावर त्वरीतच या दोघांचे लग्न घरच्यांनी अगदी मर्जीने लावून दिले होते. दोघांच्याही लग्नाला ३५ वर्ष झाली असून अजूनही दोघे सुखाचा संसार करत आहेत आणि आता त्यांना कियान नावाचा एक गोंडस नातूही आहे.