महाबळेश्वर तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी रमेश पल्लोड यांची निवड
महाबळेश्वर : महाबळेश्वर तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदाची धुरा पुन्हा एकदा लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार रमेश पल्लोड यांच्याकडॆ सोपविण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी पुन्हा एकदा पुण्यनगरीचे युवा पत्रकार सचिन नारायण शिर्के यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या निवडीची घोषणा ज्येष्ठ पत्रकार व पत्रकार संघाचे जिल्हा सदस्य विलास काळे यांनी केली. यावेळी ज्येष्ठ पत्रकार शिवजीकाका पल्लोड, बबनराव ढेबे, संजय दस्तुरे आदींसह पत्रकार संघाचे सदस्य उपस्थित होते.
ज्येष्ठ पत्रकार शिवजीकाका पल्लोड यांच्या अध्यक्षतेखाली जेष्ठ पत्रकार बबनराव ढेबे यांच्या प्रमुख उपस्थित महाबळेश्वर येथील गौतम हॉटेल सभागृहात अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न महाबळेश्वर तालुका पत्रकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या सभेत संघाची नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. ज्येष्ठ पत्रकार विलास काळे यांनी महाबळेश्वर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदाची धुरा ज्येष्ठ पत्रकार रमेश पल्लोड यांना पुन्हा एकदा सोपविण्याचा प्रस्ताव सभेपुढे ठेवला.
या नावाच्या प्रस्तावास शिवजीकाका पल्लोड व बबनराव ढेबे यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर संघाचे मावळते अध्यक्ष अजित जाधव यांनी आपल्या पदाचा कार्यभार रमेश पल्लोड यांना सुपूर्त केला. या घोषणेचे सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. नूतन अध्यक्ष रमेश पल्लोड यांचा शिवजीकाका पल्लोड, बबनराव ढेबे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
महाबळेश्वर तालुका पत्रकार संघाचे नवनियुक्त अध्यक्ष रमेश पल्लोड यांनी संघाची पुढील कार्यकारिणी जाहीर केली. संघाच्या उपाध्यक्षपदी युवा पत्रकार सचिन शिर्के, सचिवपदी जेष्ठ पत्रकार संजय दस्तुरे तर कोषाध्यक्षपदी युवा पत्रकार प्रेषित गांधी, सहसचिवपदी अजित कुंभारदरे यांची एकमताने निवड करण्यात आली.
जिल्हा पत्रकार संघाचे सदस्य जेष्ठ पत्रकार विलास काळे यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना संघातील सर्वानी एकसंध राहत सोबत घेऊन काम करण्याचे व पारदर्शक कारभाराचे आवाहन केले. यावेळी नगरसेवक रोहित ढेबे, गौतम हॉटेलचे प्रमुख रमेशभाई कौल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.






