Eid al-Adha : इराणच्या Eid al-Adha च्या शुभेच्छांवर इराणची टीका; म्हणाला, कासईसुद्धा... (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
US Strike Iran : दोन दिवसांत अमेरिकेचा दुसरा हल्ला; भीषण स्फोटांनी हादरले इराणचे अब्बास बंदर
इस्रायलने एक्सवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये जेरुसलेमकडून इस्रायल (Israel) आणि जगभरातील मुस्लिम बांधावाना ईद-अल-अधाच्या मन:पूर्वक शुभेच्छा. ईद मुबारक! असे म्हटले आहे. मात्र, या पोस्टमुळे सोशल मीडियावर वाद पेटला आहे.
हैदाराबाद येथील इराण(Iran)च्या वाणिज्य दूतावासाने, इस्रायलच्या पोस्टवर प्रतिक्रिया देत लिहिले की, आता कसाई देखील ईद-अल-अधाच्या शुभेच्छा देत आहे.’ इराणने इस्रायलला थेट कसाई संबोधल्याने मोठी खळबळ उडाली आहे. गाझामध्ये सुरु असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलने दिलेल्या या शुभेच्छावंर इराणने ताण कसला आहे. इस्रायल केवळ शुभेच्छांचा आव आणत असून त्याला कोणताही नैतिक अधिकार नाही असे इराणने म्हटले आहे.
From Jerusalem, wishing Muslims in Israel and around the world a joyful and meaningful Eid al-Adha. Eid Mubarak 🌙 pic.twitter.com/W9vXPO7ZW5 — Israel ישראל (@Israel) May 26, 2026
दरम्यान भारतातील इराणी दूतावासाने मात्र, भारताला सौहार्दपूर्ण शुभेच्छा दिल्या आहेत. इराणी दूतावासाने भारतातील मुस्लिम बांधवांना ईदच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. दूतावासाने म्हटले आहे की, हा पवित्र सण दोन्ही देशांमधील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंधाचे, मैत्रीचे प्रतीक आहे.
The butcher expressing his heartfelt wishes for a joyful Eid al-Adha. pic.twitter.com/eEFWWJn1hQ — Iran In Hyderabad (@IraninHyderabad) May 27, 2026
याच वेळी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी इराक, ओमान, कतार, तुर्की आणि इजिप्त यांसाह अनेक देशांच्या नेत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “अल्लाह सर्व मुस्लिमांची मने एकमेकांच्या जवळ आणो आणि सर्व संकटानांना एकजुटीने सामोरे जाण्याची ताकद देवो.” असे त्यांनी म्हटले.
एकीकडे संपूर्ण जग ईदच्या आनंदात बुडाला असताना दुसरीकडे अमेरिका-इस्रायल आणि इराणमध्ये तणावाचे वातावरण कायम आहे. अमेरिकेच्या सततच्या हल्ल्यांमुळे इराण संतप्त झाला असून चोख प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला आहे. तसेच इस्रायलला संपवण्याची धमकीही दिली आहे.






