Sarpanch Lata Pharande scam: १६ लाख ७७ हजारांचा कथित आर्थिक गैरव्यवहार; साताऱ्याच्या खेड ग्रामपंचातीच्या सरपंचाचा घोटाळा उघड
मिळालेल्या माहितीनुसार, सरपंच लता फरांदे यांच्या विरोधात गेल्या काही महिन्यांपासून ग्रामस्थ आणि विरोधी गटांकडून सासत्याने तक्रारी आणि आरोप केले जात होते. ग्रामपंचायतीतील निधीचा गैरवापर, अपव्यय, कामांमध्ये अनियमितता आणि अधिकारांचा गैरवापर केल्याचा तक्रारी प्रशासनाकडे दाखल झाल्या होत्या.खेड ग्रामपंचायतीच्या हद्दीतील विविध विकासकामांमध्ये ग्रामनिधीचा गैरवापर झाल्याची तक्रार पुणे येथील अभिजित खेडकर, उल्हास अग्निहोत्री, अभिषेक हरिदास तसेच खेड येथील साहिल शेख यांनी केली होती. त्यानुसार सातारा पंचायत समितीच्या तत्कालीन गटविकास अधिकाऱ्यांनी प्राथमिक चौकशी करून अहवाल जिल्हा परिषदेकडे सादर केला.
यानंतर जावली पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली. या समितीने ग्रामनिधीत सुमारे १६ लाख २७ हजार १४३ रुपयांचा आर्थिक अपहार आणि सुमारे ५० हजार रुपयांची आर्थिक अनियमितता झाल्याचे नमूद केले. तसेच या प्रकरणात सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी दोघेही जबाबदार असल्याचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला.
प्राथमिक चौकशीमध्ये फरांदे यांनी अनेक कामांमध्ये आर्थिक गैरव्यवहार केल्याचे आढळून आले होते. त्यानंतर झालेल्या तपासात त्याहून काही आरोप अधिक गंभीर असल्याचे स्पष्ट झाले. धक्कादायक बाब म्हणजे गावाच्या विकासकामांसाठी मंजूर झालेल्या निधाच्या वापरातही पारदर्शकता नसल्याचे आणि नियमांचे केल्याचे उघडकीस आले. सरपंच लता फरांदे यांनी विकास कामाच्या निधींमध्ये तब्बल १६ लाख ७७ हजार १४३ गैरव्यवहार केल्याचे उघडकीस आले.
लता फरांदे यांच्या या कारनाम्यांच्या पार्श्वभूमीव विभागीय आयुक्तांनी फरांदे यांना पदावरून निलंबित करण्याच आदेश दिला. फरांदे यांच्याबाबत घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे आता ग्रामपंचयतीच्या कारवाभावरही मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. पण कारवाईनंतर खेड तालुक्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना सुरूवात झाली आहे. नव्या शैक्षणिक आणि राजकीय घडामोडींच्या काळातच थेट सरपंचांवर निलंबनाची ही मोठी कारवाई झाल्यामुळे खेड तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याच्या स्थानिक राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे. या कथित घोटाळ्यात आणखी काही अधिकारी किंवा सदस्यांचा सहभाग आहे का, यादृष्टीने आता स्थानिक पातळीवर उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.






