फोटो- सोशल मीडिया
पुणे : गेल्या काही दिवसांपासून गुईलेन बॅरे सिंड्राेम अर्थात जीबीएसचा धोका वाढताना दिसत आहे. त्यातच या आजाराने पुण्यात शिकत असलेल्या एका विद्यार्थीनीचा मृत्यू झाला. संबंधित तरूणी पुण्यात सिंहगड परिसरात शिकत होती. तिला पाणीपुरी खाल्यानंतर त्रास होऊ लागला होता. त्यानंतर तिची तब्येत खालावली, तिच्यावर बारामतीत रुग्णालयात उपचार सुरु होते. तिचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. जीबीएस आजाराचा धोका वाढत असून बळी वाढत चालले आहेत.
तीन आठवड्यापूर्वी पुण्यातील सिंहगड परिसरात शिकत असलेल्या बारामतीतील तरुणीला पाणीपुरी खाल्ल्यानंतर त्रास सुरू झाला होता. ही तरुणी बारामतीत पोहोचल्यानंतर तिला जुलाब आणि अशक्तपणा जाणवू लागला होता. बारामतीतील रुग्णालयात उपचारासाठी गेल्यानंतर डॉक्टरांना तपासणी केली.
अमरावतीत जीबीएसचा शिरकाव
जीबीएस आजाराचा रुग्ण अमरावती जिल्ह्यात देखील आढळून आला आहे. ६५ वर्षीय या रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसीयूमध्ये दाखल केले. जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील अष्टगाव येथील ही व्यक्ती १२ दिवसांपूर्वी पुण्याहून प्रवास करून आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. मात्र, या रुग्णामुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
जळगावात बालकाला लागण
जळगावात तीन वर्षीय बालकाला जीबीएस आजार झाल्याचे उघडकीस आले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील बालरोग विभागातील अतिदक्षता वॉर्डात या बालकावर उपचार सुरू आहेत. रक्ताची तपासणी केली होती.
दूषित पाण्यामुळे होतो जीबीएस
पुणे शहरात गुईलेन बॅरे सिंड्राेम (जीबीएस) हा आजार दुषित पाण्यामुळेच हाेत असल्याची माहिती राष्ट्रीय विषाणू संस्थेने (एनआयव्ही ) दिलेल्या अहवालात स्पष्ट केले आहे. यामुळे बाधितग्रस्त भागात तात्पुरत्या स्वरुपात एक एमएलडी क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र उभे करण्याचा निर्णय महापािलका प्रशासनाने घेतला आहे. गेल्या महिनाभरापासून शहरात विशेषत: सिंहगड रस्ता भागातील नांदेड, किरकटवाडी , नांदाेशी आदी परीसरात जीबीएस या आजारांचे रुग्ण माेठ्या प्रमाणावर आढळून आले. यामुळे शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले हाेते. हा आजार संसर्गजन्य नसल्याचे वारंवार सांगण्यात येत हाेते.