फोटो सौजन्य - Social Media
Buldhana crime news: तलवारीने कापला केक; तिघांवर गुन्हा दाखल, वडगाव खंडोपत येथील घटना
फरशी चौक, एकबोटे चौक, विक्रमशी चौक, सिव्हिल लाईन, मेन रोड आदी भागांतील रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहनचालकांना त्यांचा अंदाज येत नसल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावरील खडीही उखडून पडल्याने दुचाकीस्वारांना विशेषतः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, नगरपालिकेकडून यापूर्वी खड्डे तात्पुरत्या स्वरूपात बुजविण्यात आले होते. मात्र, पहिल्याच पावसात हे सर्व खड्डे पुन्हा उघडे पडले. रस्त्यालगत असलेल्या घरांमध्ये आणि व्यावसायिक आस्थापनांमध्ये वाहनांमुळे उडणारे घाण पाणी शिरत असल्याने नागरिकांची गैरसोय वाढली आहे. तसेच साचलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती होऊन आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनत आहे.
नागरिक दीपक महाकाले यांनी सांगितले की, रस्त्यांवरील मोठ्या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने वाहनचालकांना त्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघात वाढत असून सततच्या धक्क्यांमुळे मणक्याच्या आजारांचे प्रमाणही वाढत असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली. तर श्री सेवा मेडिकलचे संचालक शिवकुमार राठी यांनी सिव्हिल लाईन भागातील साचलेल्या पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढून विविध आजारांचा धोका निर्माण होत असल्याचे सांगितले.
माजी शिक्षणाधिकाऱ्यास बेड्या; बनावट शालार्थ आयडीप्रकरणी SIT कडून कारवाई
युवक काँग्रेसचे जिल्हा महासचिव तुषार चंदेल यांनी नगरपालिकेवर टीका करत, केवळ तात्पुरती डागडुजी न करता कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. लवकरात लवकर रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत, अन्यथा युवक काँग्रेसतर्फे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
दरम्यान, नागरिकांनी नगर प्रशासनाने तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करून अपघात रोखण्यासाठी आणि नागरिकांना सुरक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली आहे.






