जामखेड : सुरत ते हैदराबाद जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग म्हणजेच ग्रीनफिल्ड प्रोजेक्ट हा जामखेड तालुक्यातून जात असून त्यात जामखेड तालुक्यातील एकूण 13 ते 14 गावांचा समावेश आहे. या ग्रीनफिल्ड प्रोजेक्टमध्ये शेतकऱ्यांच्या जाणाऱ्या जमिनी संपादित होत असताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन त्या सोडविण्यासाठी आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून नान्नज, फक्राबाद व आरणगाव या 3 ठिकाणी बैठका घेण्यात आल्या.
अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन भूसंपादनाच्या सर्व अडचणी सोडवण्याचा प्रयत्न आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून करण्यात आला. तसेच यावेळी शेतकऱ्यांचे आपापसातील वाद मिटवण्यासाठी भूमिअभिलेखच्या अधिकाऱ्यांना देखील त्यांनी यावेळी सूचना दिल्या.
हा राष्ट्रीय महामार्ग कोणत्या गटातून जाणार हे अद्याप निश्चित झालेले नाही पण असा एखादा मोठा प्रकल्प येत असेल तेव्हा अनेक एजंट शेतकऱ्यांकडून जमीन घेण्यासाठी फिरत असतात. त्यामुळे सरकारकडून देण्यात येणारा भूसंपादनाचा योग्य मोबदला हा शेतकऱ्यांऐवजी या एजंटला मिळतो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा कोणी एजंटने घेऊ नये म्हणून 13-14 गावातील शेतकऱ्यांना भेटून आमदार रोहित पवारांनी चर्चा केली. व गट निश्चित झाल्यानंतर जेव्हा सर्वे करण्यासाठी अधिकारी येतील त्यावेळी काय दक्षता घेतली पाहिजे व भूसंपादनावेळी काय काय अडचणी येऊ शकतात याची माहिती देऊन शेतकऱ्यांना मोबदला मिळताना विलंब होऊ नये यासाठी काय खबरदारी घ्यायची यासाठी देखील आमदार रोहित पवारांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
[read_also content=”मनसेतील अंर्तगत वाद पुन्हा चव्हाट्यावर; मनसे शहर पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतून वसंत मोरे याचं नाव वगळले https://www.navarashtra.com/maharashtra/mns-internal-disputes-resurface-vasant-mores-name-was-dropped-from-the-meeting-of-mns-city-office-bearers-nrdm-280321.html”]
रोहित पवार यांची प्रतिक्रिया?
मतदारसंघात असणाऱ्या शेतकऱ्यांना आणि भूमिपुत्रांना सरकारकडून मोबदला हा विनामध्यस्ती मिळाला पाहिजे व कोणत्याही एजंटने शेतकऱ्यांचा गैरफायदा घेतला नाही पाहिजे या हेतूने आम्ही सर्व बैठका घेतल्या आणि शेवटी सर्वस्वी निर्णय शेतकऱ्याचा असतो. पण याबद्दल माहिती शेतकऱ्यांना देणे हे लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी आहे. असी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी दिली.