शतकीय महोत्सवाकडे जाणारा राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचा नागपूरमध्ये विजयदशमी सोहळा पार (फोटो - एक्स)
RSS Dasara Melava 2024 : नागपूर: देशभरामध्ये सर्वत्र साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दसरा सण उत्साहामध्ये साजरा केला जातो आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचा विजयादशमीचा उत्सव देशभरामध्ये गाजलेला आहे. नागपूरमध्ये आरएसएसचा सोहळा पार पडत असून यामध्ये प्रमुख पाहुण्यांसह सरसंघचालक डॉ. मोहन भागवत उपस्थित आहेत. त्याचबरोबर प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे अर्थात इस्रोचे माजी अध्यक्ष पद्भूषण डॉ. के. राधाकृष्णन आणि इस्रोचे माजी अध्यक्ष डॉ. के. सिवन उपस्थित आहेत.
नागपूरमधील रेशीमबाग या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव आणि पुजा सुरु आहे. त्याचबरोबर संपूर्ण राज्यातील शाखांमध्ये विजयादशमीच्या निमित्ताने उत्सवाचे वातावरण असून पथसंचलन करण्यात आले. मुसळधार पावसामुळे कार्यक्रमामध्ये कोणताही व्यत्यय आलेला नसून पावसामध्ये देखील पथसंचलन सुरू झाले. त्याचबरोबर विविध शस्त्रांची देखील पूजा करण्यात आली. सरसंघचालक मोहन भागवत यांनी सर्व अस्त्र शस्त्रांची पूजा करुन उपस्थितांना संबोधित केले. यावेळी संघ शतकोत्तर प्रवास सुरु करत असल्यामुळे भूमिका देखील स्पष्ट केली. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आदींची उपस्थिती आहे.
हे देखील वाचा : राज ठाकरेंचा डिजीटल दसरा मेळावा; पॉडकास्टच्या माध्यमातून पहिल्यांदा साधणार संवाद
यावेळी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी नागपूरमधील कार्यक्रमातून सर्व संघ सेवकांना संबोधित केले. यावेळी त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यबाई होळकर यांचे स्मरण केले. तसेच देशातील विविध विषयांवर भाष्य केले. मोहन भागवत म्हणाले की, आपल्या देशाचा विचार करता तो पुढे मार्गक्रमण करत आहे. अशा सर्व क्षेत्रांमध्ये भारत पुढे जात आहे. समाजाची समजही वाढत आहे. परिणामी जम्मू-काश्मीरच्या निवडणुकाही शांततेत पार पडल्या. याचाच परिणाम म्हणून जगभरात भारताची प्रतिष्ठा वाढली आहे. वसुधैव कुटुंबकम् हा आपला विचार सगळ्यांना मान्य आहे. आपला योग आणि त्याचं शास्त्रही जग स्वीकारत आहे. पर्यावरणाचा आपला दृष्टीकोन सर्वांनी स्वीकारला. आपल्या देशाची सुरक्षा, एकता, अखंडता आणि विकास सुनिश्चित करण्यासाठी चारित्र्याचे अनेक पैलू निर्दोष आणि परिपूर्ण असणे अत्यंत आवश्यक आहे. वैयक्तिक आणि राष्ट्रीय चारित्र्याच्या या सरावात आपण सर्वांनी सजग आणि सतत व्यस्त राहावे लागेल असे भागवत यांनी आपल्या भाषणात सांगितले.
Earlier in the morning at 6:15 am, the swayamsevaks of Nagpur participated in the patha-sanchalan (route-march) . This #Vijayadashami It has been raining since early morning at Nagpur. #RSS100 pic.twitter.com/C76wz9dg1W
— RSS (@RSSorg) October 12, 2024
पुढे त्यांनी देशामध्ये सुरु असलेल्या गुन्हेगारीवर भाष्य केले. ते म्हणाले की, “मूल्यांच्या ऱ्हासाचा परिणाम आहे की, मातृत्वाची जबाबदारी” मानल्या जाणाऱ्या आपल्या देशात मातृशक्तीला अनेक ठिकाणी बलात्कारासारख्या घटनांना सामोरे जावे लागत आहे. कोलकाताच्या आर.जी. कार हॉस्पिटलमध्ये घडलेली घटना ही संपूर्ण समाजाला कलंकित करणारी घटना आहे. एवढा मोठा गुन्हा घडल्यानंतरही गुन्हेगारांना संरक्षण देण्यासाठी काही लोकांकडून जे घृणास्पद प्रयत्न केले जातात. त्यातून गुन्हेगारी, राजकारण आणि वाईट संस्कृती यांची सांगड आपल्याला कशी बिघडवत आहे, हे दिसून येते. बांगलादेशातून भारतात होणारी बेकायदेशीर घुसखोरी आणि परिणामी लोकसंख्येचा असमतोल हा देशातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये गंभीर चिंतेचा विषय बनला आहे. या अवैध घुसखोरीमुळे परस्पर सौहार्द आणि देशाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. बांगलादेशात अल्पसंख्याक बनलेल्या हिंदू समाजाला औदार्य, मानवता आणि सद्भावना यांना पाठिंबा देणाऱ्या सर्वांची, विशेषतः भारत सरकार आणि जगभरातील हिंदूंची मदत आवश्यक आहे. असंघटित आणि दुर्बल राहणे म्हणजे दुष्टांच्या अत्याचारांना आमंत्रण देणे, हा धडा जगभरातील हिंदू समाजानेही घेतला पाहिजे. पण प्रकरण इथेच थांबत नाही. आता भारतातून सुटण्यासाठी पाकिस्तानला भेटल्याची चर्चा आहे. अशा चर्चा घडवून भारतावर कोणकोणत्या देशांना दबाव आणायचा आहे, हे सांगण्याची गरज नाही. त्याची उपाययोजना हा शासनाचा विषय आहे, असे मत मोहन भागवत यांनी मांडले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ द्वारा नागपुर में आयोजित विजयादशमी उत्सव के अवसर पर शस्त्र पूजन करते हुए सरसंघचालक मोहन भागवत जी और प्रमुख अतिथि पद्म भूषण डा. के. राधाकृष्णन।
समस्त देशवासियों को श्री विजयादशमी की हार्दिक शुभकामनाएं #RSS100 pic.twitter.com/agzn7MO5Gn— RSS (@RSSorg) October 12, 2024
मोहन भागवत यांनी हिंदूंना संघटित होण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले की, बांगलादेशमधील हिंदूच नाही तर इतर अल्पसंख्यांकावर हल्ला चढवले. पण येथील हिंदू एकत्रित आले. संघटनेतून त्यांनी या अन्यायाला वाचा फोडली. दुर्बलता हा अपराध आहे, दुर्बलता म्हणजे अत्याचाराला निमंत्रण देणे आहे. त्यामुळे हिंदू समाजाने संघटन करणे आवश्यक आहे. सशक्त राहावे. केवळ बांगलादेशातच नाही तर भारतात पण हा धोका आहे. आपल्या देशात पण त्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. देशात, समाजा-समाजात फुट पाडण्याचा प्रयत्न सुरू आहेत. फुटीरता आणण्याचे प्रयत्न सुरू असून ते ओळखता आले पाहिजेत. काही जण नॅरेशन तयार करत आहेत. ते कोण करत आहेत त्यांचा नाव घेण्याची गरज नाही.