युक्रेन : गेल्या काही महिन्यापासून युक्रेन रशियाच युद्ध सुरू आहे. आता रशियाच्या ( Russia ) सैन्याने युक्रेनमधील ( Ukraine ) खेरसन ( Kherson ) शहरातून माघार घेतल्याची माहिती आहे. रशियन सैन्य परतल्याने आता पुन्हा हे शहर युक्रेनच्या ताब्यात आलं आहे. रशियन सैन गेल्यानंतर खेरसन वासियांनी एकच जल्लोष केला.
[read_also content=”एलॉन मस्कच्या फॅन्सनी बनवला त्यांचा ३० फूटांचा पुतळा, खर्चाचा आकडा ऐकाल तर बसेल धक्का https://www.navarashtra.com/world/elon-musk-30-feet-statue-made-in-canada-nrsr-343960.html”]
रशियाच्या ( Russia ) सैन्याने युक्रेनमधील ( Ukraine ) खेरसन ( Kherson ) शहरातून माघार घेतल्यानंतर आता पुन्हा हे शहर युक्रेनच्या ताब्यात आलं आहे. खेरसन मधून बाहेर पडताच आता युक्रेनियन नागरिक शहरात परतायला लागले आहेत. पुन्हा एकदा या शहरावर युक्रेनची सत्ता आली आहे. त्यामुळे नागरिकांनी आंनद व्यक्त केला. युक्रेनच्या नागरिकांसोबत लष्करी अधिकारी, पोलीस अधिकारी खेरसन शहरात परतले आहेत.
[read_also content=”मोठी बातमी! पिरवाडीला मिळाली नवी ओळख; किनाऱ्यावर सापडल्या तीन पाषाणमूर्ती https://www.navarashtra.com/maharashtra/three-stone-idols-found-on-pirwadi-beach-nrvb-344133.html”]
युक्रेनविरुद्ध युद्ध सुरू झाल्यानंतर काही दिवसांनी रशियन सैन्याने प्रांतीय राजधानी खेरसन शहर ताब्यात घेतलं होतं. आता खेरसनमधून रशियन फौजफाटा माघारी परतल्यानंतर आणि युक्रेनियन सैनिक आणि नागरिक शहरातील जल्लोष करताना दिसले. याआधी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांचे वक्तव्यही समोर आले होते. आम्ही खेरसन शहर पुन्हा ताब्यात घेऊ, असं त्यांनी म्हटलं होतं.