जळगाव: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज जळगावमध्ये जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या पार्श्वभुमीवर अनेक नेते मंडळी जळगावमध्ये दाखल झाले आहेत. या सभेपुर्वी ठाकरे गटाचे नेत संजय राऊत यांच्या एका वक्तव्याने सध्या खळबळ उडाली आहे. ‘ शिंदे यांच्या सरकारचे डेथ वॉरंट जारी झाले असून हे सरकार १५-२० दिवसांत पडेल, असा दावा संजय राऊत यांनी रविवारी केला. पत्रकारांशी संवाद साधताना राऊत म्हणाले की, त्यांचा पक्ष न्यायालयाच्या आदेशाची वाट पाहत आहे. आम्हाला न्याय मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
[read_also content=”घराच्या व्हरांड्यात खेळणाऱ्या दीड वर्षाच्या चिमुरडीवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला! उपचारा दरम्यान मुलीनं सोडला जीव https://www.navarashtra.com/latest-news/stray-dogs-attacked-a-one-and-a-half-year-old-girl-playing-in-outside-of-the-housethe-girl-died-during-treatment-nrps-390468.html”]
संजय राऊत यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या खटल्याचा संदर्भ दिला ज्यात शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय येणे अद्याप बाकी आहे. मागच्या वर्षी शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व स्वीकारण्यास नकार देत एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा दिला. आमदारांच्या या बंडखोरीविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून १६ बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी केली होती. याचा दाखला देत राऊत म्हणाले, “सध्याचे मुख्यमंत्री आणि त्यांचे 40 आमदारांचे सरकार 15 ते 20 दिवसांत पडेल. या सरकारचे डेथ वॉरंट निघाले आहे. आता त्यावर कोण सही करणार हे ठरवायचे आहे.
“ गेल्या वर्षी जूनमध्येच शिवसेना नेते शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना बंडखोरी केली होती. शिंदे यांनी शिवसेनेच्या 39 आमदारांना सोबत घेऊन स्वतंत्र गट स्थापन केला होता, त्यानंतर राज्याच्या राजकारणात भूकंप झाला होता. शिंदे यांनी महाविकास आघाडी तोडून भारतीय जनता पक्षाशी युती केली. काँग्रेस पक्ष आणि भारतीय राष्ट्रवादी काँग्रेसकडून वैचारिक मतभेद आणि अन्यायकारक वागणूक याला कारणीभूत ठरल्याच म्हणण्यात येत होतं. यासोबतच शिंदे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही अनेक आरोप केले होते.