संजय शिरसाटांसह 'या' नेत्यांचे SIT चौकशी करा ; संजय राऊतांचा शिंदे गटावर निशाणा
Sanjay Raut News: राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना शिरसाट यांनी तो व्हिडीओ आपला असलता तरी तो मॉर्फ केला असल्याचा दावा केला आहे. मात्र, या व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील पाच मंत्र्यांविरोधात एसआयटी किंवा न्यायालयीन चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. यामध्ये संजय राठोड, संदीपान भुमरे, संजय शिरसाट आणि उदय सामंत यांची नावे त्यांनी स्पष्टपणे घेतली आहेत.
संजय शिरसाट यांच्या व्हिडीओमध्ये छेडछाड करण्यात आल्याचा शिवसेनेचा आरोप आहे आणि याप्रकरणी मानहानीचा दावा दाखल केला जाईल. या प्रश्नावर उत्तर देताना खासदार राऊत म्हणाले की, व्हिडिओमध्ये छेडछाड झाली आहे की नाही हे फॉरेन्सिक लॅब ठरवेल. त्यांनी विधानसभेत याबद्दल निवेदन द्यावे.
राऊत म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या १२ किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे. भाजप हा क्षणसाजरा करत आहे. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, पण त्यांचा यात काय संबंध? महाराष्ट्रातील गोष्टींना जागतिक वारसा दर्जा आधी मिळाला नव्हता का? ते किल्ले तुम्ही बांधले का? यावर राजकारण करू नका,’ असा खोचक टोलाही त्यंनी यावेळी लगावला
धारावीत जमीन घोटाळ्याकडेही त्यांनी यावेळी लक्ष वेधले, “मुंबईत धारावी येथील जमीन घोटाळा झाला आहे. मुंबई लुटली जात आहे. मुंबईत मराठी लोकांना हाकलून लावले जात आहे. मराठी लोकांना इथून हाकलले जात आहे. मुंबई उद्ध्वस्त करण्याचा कट रचला जात आहे. धारावी हे याचे एक उदाहरण आहे. जर आज उद्धव ठाकरे असते तर त्यांनी धारावीचा प्रकल्प पुढे ढकलला असता. या प्रकल्पात भ्रष्टाचार सुरू आहे.” असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
गाढवाचं लग्नमधील गंगी आता कशी दिसते? ट्रान्सफॉर्मशन पाहाल तर फोटोजवर विश्वासच बसणार नाही
मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीवर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.”या विषयावर खूप चर्चा झाली आहे आणि अजूनही सुरू आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का? पुढे काय होईल? हे वेळच ठरवेल. सध्या महानगरपालिका निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत. त्या आधी अंदाज लावण्यात अर्थ नाही,” असे राऊत म्हणाले.
राऊत म्हणाले, “लोकांच्या भावना, इच्छा आणि अपेक्षा या दोन्ही नेत्यांबद्दल आहेत. स्वतः राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्याची प्रतिज्ञा व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरेही म्हणाले आहेत की, ‘लोकांच्या मनात जे आहे, ते होईल.’ त्यामुळे फार चर्चा करण्याऐवजी योग्यवेळी योग्य निर्णय होतील.”