मेडिकल स्टोअर्स बंदमुळे नागरिक हैराण; मागण्या न मानल्यास बेमुदत आंदोलनाचा इशारा
औषध विक्रेत्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत जिल्हा केमिस्ट असोसिएशनने आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. मागण्यांवर लवकर तोडगा न निघाल्यास पुढील टप्प्यात बेमुदत बंद आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. यासंदर्भातील निवेदन बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.
दरम्यान, या परिस्थितीची दखल घेत अन्न व औषध प्रशासन विभागाने नागरिकांना शांतता आणि संयम राखण्याचे आवाहन केले आहे. सहाय्यक आयुक्त रु. वि. पोंगळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच आवश्यक औषधांचा मर्यादित आगाऊ साठा करून ठेवावा, असे सांगितले. औषधांचा कृत्रिम तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाकडून विशेष लक्ष ठेवण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
Nashik News : पावसाळ्यापूर्वी मनपाची धावपळ; शहरातील 211 ठिकाणी पाणी साचण्याचा धोका, मनपा अलर्ट मोडवर
संपाच्या पार्श्वभूमीवर काही पर्यायी सेवा सुरू ठेवण्यात आल्या आहेत. मेडप्लस, वेलनेस फॉरएव्हर यांसारख्या साखळी औषध दुकानांसह संघटनेबाह्य मेडिकल, रुग्णालयांशी संलग्न मेडिकल स्टोअर्स आणि काही जेनेरिक औषध दुकाने सुरू राहणार आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालय तसेच अन्य रुग्णालयांमधील आपत्कालीन सेवा पूर्ववत सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले.
आरोग्य सेवा विस्कळीत होऊ नये यासाठी प्रशासनाने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले आहे. औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० अंतर्गत औषध विक्री परवाने सार्वजनिक हितासाठी देण्यात आले असल्याने कायद्याचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान, नागरिकांनी घाबरून जाऊ नये तसेच आपत्कालीन परिस्थितीत तातडीने प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे.
Yashwant Co-operative Bank: साताऱ्यातील सहकार क्षेत्राला मोठा धक्का; यशवंत बँकेचे व्यवहार तत्काळ बंद






