मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा (Resigns From Post) देण्याची घोषणा केली. त्यानंतर गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यातील राजकारणात (Maharashtra Politics) मोठा भूकंप झाला असून राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा यासाठी अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यातच राष्ट्रवादी युवक काँग्रेस (NCP Youth Congress) आणि राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी उपोषण (Hunger Strike) सुरू केले आहे. यातही काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी स्वतःच्या रक्ताने शरद पवार यांना पत्र लिहून राजीनामा मागे घेण्याची मागणी केली आहे. अखेर जनक्षोभ पाहता शरद पवार हे कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी वाय.बी.चव्हाण सेंटरमधून बाहेर येत त्यांनी कार्यकर्त्यांशी आज संवाद साधला.
दोन दिवसांपासून वाय.बी.चव्हाण सेंटरच्या बाहेर आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न अनेक पदाधिकाऱ्यांनी केला. सुप्रिया सुळे, अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांनीही समजूत घातली. परंतु कार्यकर्ते ऐकत नसल्याने अखेरीस शरद पवार यांनी संवाद साधला. अगदी मोजक्या शब्दांत शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. ते म्हणाले, तुमच्या भावनांचा आदर केला जाईल. कार्यकर्त्यांच्या मनातील भावना दुर्लक्षित करणार नाही. दोन दिवसानंतर तुम्हाला असे बसावे लागणार नाही. आपण एक-दोन दिवसांत अंतिम निर्णय घेऊ. उद्या राष्ट्रवादीच्या समितीची बैठक होणार आहे. त्या बैठकीच्या निर्णयानंतर आपण निर्णय घेऊ.
[read_also content=”मागितली लाच, दिली २०० रुपये, नाव अन् खाकीलाही आणली लाज; ट्रॅफिक हवालदार ACB च्या जाळ्यात https://www.navarashtra.com/maharashtra/while-taking-only-rs-200-bribe-traffic-police-constable-arrested-by-dhule-acb-nrvb-394727.html”]
आजही शरद पवार यांच्याशी बोलताना युवक युवतींनी त्याच भावना व्यक्त केल्या. शेतकरी-दलित-वंचित-आदिवासी यांच्यासाठी साहेब तुम्ही राजकारणात राहणं आवश्यक आहे. भाजपला जर रोखायचं असेल तर तुम्हीच विरोधी पक्षांची एकजूट घडवून आणू शकता. आपल्या निर्णयाचा समाजातील सगळ्या घटकांच्या आयुष्यावर परिणाम होणार आहे, असे नमूद करत मेहबूब शेख यांनी शरद पवार यांना माघार घ्या म्हणून आर्जव केलं. तर आमच्यासारख्या शेतकऱ्यांच्या, गरिबाघरच्या पोरी राजकारणात आल्या, त्याच साहेब तुमच्यामुळे… तुम्हीच जर पदावर नसाल तर आमचं काय होणार, अशा भावना व्यक्त केल्या.
[read_also content=”आजचे राशीभविष्य : 4 May 2023, कसा जाईल आजचा दिवस; वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/web-stories/today-daily-horoscope-4-may-2023-rashibhavishya-in-marathi-nrvb/”]
उपोषण आणि आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना सर्वात आधी सुप्रिया सुळे यांनी समजवण्याचा प्रयत्न केला. शरद पवार यांनी दोन दिवसांचा अवधी मागितला आहे. उद्या सकाळी बैठक होणार आहे. तो पर्यंत वाट बघू नाहीतर पुन्हा तुम्ही बसा असं सांगत सुप्रिया सुळे यांनी उपोषण कर्त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला मात्र तो प्रयत्न यशस्वी झाला नाही. पुढे जाऊन सुप्रिया सुळे म्हणाल्या, शरद पवार यांच्याशी पाच जण चर्चेला चला म्हणून सांगितले. मात्र, आता चर्चा नको साहेबच आम्हाला अध्यक्ष म्हणून हवे आहेत, असा हट्ट करत सुप्रिया सुळे यांनाच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सांगितले. त्यामुळे पदाधिकारी आपल्या मागणीवर ठाम असल्याने सुप्रिया सुळे यांनी तिथून काढता पाय घेण्याशिवाय गत्यंतर राहिले नाही.