शिवसेनेच्या पक्षप्रवेश सोहळ्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांची उपस्थिती; महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडल्यापासून राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. कोण कोणत्या पक्षात जाईल हे सांगता येत नाही अशी स्थिती आहे. दररोज एक नेता पक्ष सोडतो आणि दररोज एक नवीन पक्षप्रवेश होतो. महाराष्ट्राच्या राजकारणात इतकी मोठी अस्थिरता क्वचितच निर्माण झाली असेल. दरम्यान आज पक्षप्रवेशाने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारणही तसंच आहे, नेता कॉंग्रेसचा, पक्षप्रवेश शिवसेनेचा आणि उपस्थिती मात्र राष्ट्रवादीच्या आमदारांची असं काहीसं चित्र आज पहायला मिळालं, त्याची चर्चा राज्यभर रंगली आहे.
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अक्कलकोट येथे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचा पक्षप्रवेश होत आहे. मात्र, शिवसेना शिंदे गटाच्या या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार उपस्थित होते. त्यामुळे त्यांना पाहून अनेकांच्या भुवया उचावल्या आहेत. शिवसेना नेते आणि मोहोळचे आमदार राजू खरे यांनी या पक्षप्रवेश सोहळ्याला उपस्थिती लावली होती.
पक्षप्रवेश सोहळ्याच्या या सोहळ्यानिमित्त एकनाथ शिंदेंचे स्वागत करणारी जाहिरात देखील राजू खरे यांनी दिली होती. त्यानंतर आता थेट शिवसेनेच्या व्यासपीठावर पोहोचले होते. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून राजू खरे यांच्या शिवसेनेतील प्रवेशाच्या चर्चा आहेत. मंत्री भरत गोगावले यांनी राजू खरे यांचा पाहुणचार स्वीकारत त्यांच्या फॉर्म हाऊसवर जेवणही केलं होतं. राजू खरे शरद पवार गटातून निवडून आल्यानंतर निवडणूक आले आहेत. मात्र आमदार होऊनही त्यांना विरोधी बाकावर बसावं लागलं. त्यामुळे ते इतर पक्षांच्या शोधात असल्याची चर्चा आहे.
पक्षप्रवेशापूर्वी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सिद्धाराम म्हेत्रे म्हणाले, शिवसेना हाच खऱ्या अर्थ्याने धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. त्यामुळे या पक्षासोबत काम करताना मला कोणीतीही अडचण नाही. कार्यकर्त्यांचा आग्रह होता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत गेलं पाहिजं. सचिन कल्याणशेट्टी मित्र पक्षाचे नेते आहेत, त्यामुळे त्यांच्यासोबत देखील मी जुळवून घेण्याचा प्रयत्न करेन, असं त्यांनी म्हटलं आहे.