• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Sharad Pawars Letter To Railway Minister To Stop The Express At These Stations

Kokan Railway: कोकणवासीयांसाठी शरद पवार मैदानात; ‘या’ स्थानकांवर एक्स्प्रेसला थांबा देण्यासाठी थेट रेल्वे मंत्र्यांना पत्र

तळकोकणातील कुडाळ, कणकवली आणि सावंतवाडी या महत्त्वाच्या स्थानकांवर लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्याची मागणी पवारांनी पत्राद्वारे केली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Oct 07, 2025 | 09:26 PM
कोकणवासीयांसाठी शरद पवार मैदानात (Photo Credit- X)

कोकणवासीयांसाठी शरद पवार मैदानात (Photo Credit- X)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • कोकणवासीयांसाठी शरद पवार मैदानात
  • ‘या’ स्थानकांवर एक्स्प्रेसला थांबा देण्यासाठी थेट रेल्वे मंत्र्यांना पत्र
  • प्रमुख सणांदरम्यान प्रायोगिक थांबा देण्याची मागणी
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी कोकण रेल्वेच्या (Kokan Railway) प्रवाशांच्या जिव्हाळ्याच्या मागणीसाठी थेट केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहिले आहे. तळकोकणातील कुडाळ, कणकवली आणि सावंतवाडी या महत्त्वाच्या स्थानकांवर लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्याची मागणी पवारांनी पत्राद्वारे केली आहे.

पर्यटनासाठी अडथळे, प्रवाशांना गैरसोय

या पत्रात शरद पवार यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा असून, येथील निसर्गरम्य समुद्रकिनारे आणि समृद्ध वारसा यामुळे लाखो पर्यटक येथे येतात. मात्र, अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या या जिल्ह्यात न थांबताच पुढे जात असल्याने स्थानिकांसह विद्यार्थी, व्यावसायिक आणि पर्यटकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

कोकणवासीयांसाठी जिव्हाळ्याचा आणि महत्त्वाचा विषय असलेल्या ‘कोकण रेल्वे’च्या कुडाळ, कणकवली व सावंतवाडी या स्थानकांवर एक्स्प्रेस गाड्यांना थांबा देण्याच्या तळकोकणाच्या प्रलंबित मागणीसंदर्भात केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव ह्यांना पत्र लिहिलं. महाराष्ट्रातील ‘सिंधुदुर्ग’ हा… pic.twitter.com/kMQLfKotFn — Sharad Pawar (@PawarSpeaks) October 7, 2025

पवार पत्रात म्हणतात, “लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा नसल्याने इथले नागरिक, विद्यार्थी, व्यावसायिक आणि रुग्ण यांना प्रवासात मोठी गैरसोय होते. त्यामुळे स्थानिक अर्थकारणावरही विपरित परिणाम होत आहे.”

Konkan Railway : कोकण वासियांवर अन्याय! ‘या’ ट्रेनला सिंधुर्दुगात थांबा द्या, प्रवासी संघटनेचे रेल्वेस्थानकावर जनआंदोलन

प्रमुख सणांदरम्यान प्रायोगिक थांबा देण्याची मागणी

प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन पवारांनी रेल्वे मंत्र्यांकडे विशिष्ट कालावधीत प्रायोगिक तत्त्वावर थांबा देण्याची विनंती केली आहे. जसे की, पर्यटन हंगाम, प्रमुख सण गणेश चतुर्थी, दसरा, दिवाळी, नववर्ष, होळी आणि उन्हाळी सुट्टी. शरद पवार यांनी पत्रात नमूद केले आहे की, सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर थांबे दिल्यास या मागणीची व्यवहार्यता स्पष्ट होईल.

कोकण आणि महाराष्ट्राच्या पर्यटनाला चालना मिळणार

रेल्वे मंत्र्यांनी सकारात्मक निर्णय घेतल्यास त्याचे अनेक फायदे होतील. यामुळे केवळ तळकोकणातील नागरिकांच्या प्रलंबित मागणीला न्याय मिळणार नाही, तर महाराष्ट्राच्या पर्यटनालाही मोठी चालना मिळेल. स्थानिकांना प्रवासाची सोय उपलब्ध होईल आणि येथील स्थानिक उत्पादने तसेच हस्तकला वस्तूंच्या वाहतुकीलाही प्रोत्साहन मिळेल. शरद पवार यांनी स्वतः लक्ष घालून हा महत्त्वाचा विषय केंद्रीय मंत्र्यांकडे मांडला आहे. आता रेल्वे मंत्रालय यावर काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं, पण…; पडळकरांच्या जयंत पाटलांवरील टीकेवर शरद पवारांची प्रतिक्रीया

Web Title: Sharad pawars letter to railway minister to stop the express at these stations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2025 | 09:25 PM

Topics:  

  • Kokan News
  • kokan railway
  • maharashtra news
  • Sharad Pawar

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: शरद पवार गेम फिरवणार! राज ठाकरेंची मनसे MVA मध्ये करणार प्रवेश? भाजपसाठी हा मोठा धक्का
1

Maharashtra Politics: शरद पवार गेम फिरवणार! राज ठाकरेंची मनसे MVA मध्ये करणार प्रवेश? भाजपसाठी हा मोठा धक्का

Ahilyanagar News: नेवासेत अग्नितांडव! सात दुकाने अक्षरशः जाळून खाक, कोट्यवधींचे नुकसान
2

Ahilyanagar News: नेवासेत अग्नितांडव! सात दुकाने अक्षरशः जाळून खाक, कोट्यवधींचे नुकसान

Ladki Bahin Yojana : वडील आणि पती नसलेल्या लाडक्या बहिणींचा E-KYC चा मार्ग झाला मोकळा; अंगणवाडी सेविका करणार मदत
3

Ladki Bahin Yojana : वडील आणि पती नसलेल्या लाडक्या बहिणींचा E-KYC चा मार्ग झाला मोकळा; अंगणवाडी सेविका करणार मदत

Sharad Pawar : सत्याच्या मोर्च्यामध्ये एकत्र येता तर निवडणुकीत का नाही? मविआच्या जेष्ठ नेत्यांनी धरले कॉंग्रेसचे कान
4

Sharad Pawar : सत्याच्या मोर्च्यामध्ये एकत्र येता तर निवडणुकीत का नाही? मविआच्या जेष्ठ नेत्यांनी धरले कॉंग्रेसचे कान

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Pune Munnicial Elections: प्रारूप यादीत मतदारांची पळवापळवी; तीन लाख मतदारांवर प्रश्नचिन्ह, मतदारांकडून हरकतींचा भडिमार

Pune Munnicial Elections: प्रारूप यादीत मतदारांची पळवापळवी; तीन लाख मतदारांवर प्रश्नचिन्ह, मतदारांकडून हरकतींचा भडिमार

Nov 22, 2025 | 10:51 AM
Vinayak Chaturthi 2025: विनायक चतुर्थीच्या रात्री करा ‘हे’ उपाय, तुम्हाला मिळेल अपेक्षित यश

Vinayak Chaturthi 2025: विनायक चतुर्थीच्या रात्री करा ‘हे’ उपाय, तुम्हाला मिळेल अपेक्षित यश

Nov 22, 2025 | 10:50 AM
सोन्याची किंमत गगनाला भिडली, भारताचा फॉरेक्स रिझर्व्ह नव्या उंचीवर; 5.54 अब्ज डॉलरची जबरदस्त वाढ

सोन्याची किंमत गगनाला भिडली, भारताचा फॉरेक्स रिझर्व्ह नव्या उंचीवर; 5.54 अब्ज डॉलरची जबरदस्त वाढ

Nov 22, 2025 | 10:38 AM
मधुमेहाच्या रुग्णांसाठी ‘ही’ फळे ठरतील अमृतासमान, नियमित खाल्ल्यास अजिबात वाढणार नाही रक्तातील साखरेची पातळी

मधुमेहाच्या रुग्णांसाठी ‘ही’ फळे ठरतील अमृतासमान, नियमित खाल्ल्यास अजिबात वाढणार नाही रक्तातील साखरेची पातळी

Nov 22, 2025 | 10:37 AM
Flipkart Black Friday: विशलिस्ट तयार केली का? Flipkart ब्लॅक फ्राइडे सेलची तारीख जाहीर, आता स्वस्तात खरेदी करा महागडे प्रोडक्ट्स

Flipkart Black Friday: विशलिस्ट तयार केली का? Flipkart ब्लॅक फ्राइडे सेलची तारीख जाहीर, आता स्वस्तात खरेदी करा महागडे प्रोडक्ट्स

Nov 22, 2025 | 10:22 AM
भारत होणार मालामाल! दुबई एअर शोमध्ये ‘BrahMos’ खरेदीदारांच्या रांगा

भारत होणार मालामाल! दुबई एअर शोमध्ये ‘BrahMos’ खरेदीदारांच्या रांगा

Nov 22, 2025 | 10:19 AM
Smriti Mandhana Haldi Ceremony : चॅम्पियन खेळाडूच्या हळदीला सुरुवात, जेमीमा – राधाची ‘टीम ब्राइड’ तयार

Smriti Mandhana Haldi Ceremony : चॅम्पियन खेळाडूच्या हळदीला सुरुवात, जेमीमा – राधाची ‘टीम ब्राइड’ तयार

Nov 22, 2025 | 10:19 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Amravati : पक्षापेक्षा जनतेच हित पहा Ravi Rana यांचा Yashomati Thakur यांना सल्ला

Amravati : पक्षापेक्षा जनतेच हित पहा Ravi Rana यांचा Yashomati Thakur यांना सल्ला

Nov 21, 2025 | 11:20 PM
Kolhapur Politics :  कागल नगरपालिकेत हसन मुश्रीफ यांच्या विरोधात शिवसेनेचा शड्डू

Kolhapur Politics : कागल नगरपालिकेत हसन मुश्रीफ यांच्या विरोधात शिवसेनेचा शड्डू

Nov 21, 2025 | 08:07 PM
Kolhapur News : यड्रावकरांच्या विरोधात जयसिंगपूर मध्ये स्वाभिमानी ,काँग्रेस आणि भाजप एकत्र

Kolhapur News : यड्रावकरांच्या विरोधात जयसिंगपूर मध्ये स्वाभिमानी ,काँग्रेस आणि भाजप एकत्र

Nov 21, 2025 | 07:58 PM
Sambhajinagar : ज्यांची घरे पाडली त्यांना मोबदला द्यावा-हर्षवर्धन जाधव

Sambhajinagar : ज्यांची घरे पाडली त्यांना मोबदला द्यावा-हर्षवर्धन जाधव

Nov 21, 2025 | 07:52 PM
Latur : जिल्ह्यातील भाजपचे आमदार अभिमन्यू पवारांसह जिल्ह्यातील नेते उपस्थित

Latur : जिल्ह्यातील भाजपचे आमदार अभिमन्यू पवारांसह जिल्ह्यातील नेते उपस्थित

Nov 21, 2025 | 07:20 PM
Virar News : रात्री बनवला रस्ता, 8 तासात खडी निघाली, डांबर टाकले नाही

Virar News : रात्री बनवला रस्ता, 8 तासात खडी निघाली, डांबर टाकले नाही

Nov 21, 2025 | 07:14 PM
बिबट्यांच्या संख्या वाढीमागे गुजरात? निलेश लंकेंनी केला मोठा दावा,केंद्रीय वनमंत्र्यांनाही दिले पत्र

बिबट्यांच्या संख्या वाढीमागे गुजरात? निलेश लंकेंनी केला मोठा दावा,केंद्रीय वनमंत्र्यांनाही दिले पत्र

Nov 21, 2025 | 07:08 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.