म्हसवड : सहकार क्षेत्रात अव्वलस्थानी असलेल्या येथील अहिंसा नागरी पतसंस्थेने सामाजिक क्षेत्रातही आपले मोठे योगदान दिले आहे, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग कार्य करणार्या व्यक्तींचा या पतसंस्थेने नेहमीच पुरस्कार देऊन गौरव केला असून यंदाही हिंदी दिनानिमीत्त म्हसवड येथील सिध्दनाथ विद्यालयातील आदर्श शिक्षक अशी प्रतिमा असलेल्या शशीकांत म्हमाणे यांना अहिंसा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
१० जानेवारी हा दिवस विश्व हिंदी दिन म्हणुन साजरा करण्यात येतो. त्या दिवशीच हिंदी विभागात विशेष योगदान असणारे शिक्षक शशिकांत म्हमाने यांना सातारा जिल्हा शिक्षक बँकेचे व्हा. चेअरमन विजयराव बनसोडे यांच्या हस्ते देऊन सन्मानित करून विश्व हिंदी दिनआगळा वेगळा स्वरूपात साजरा करण्यात आला.
यावेळी जिल्हा बँकेचे व्हा. चेअरमन विजयराव बनसोडे,पुरस्कार प्राप्त शिक्षक शशिकांत म्हमाने, संस्थेचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष नितिन दोशी, सिद्धनाथ हायस्कूलचे व जुनिअर कॉलेजचे प्राचार्य प्रविण दासरे, विठ्ठल सजगाने, संतोष देशमुख उपस्थित होते. म्हमाने यांना शाल, सन्मानचिन्ह, रोख रक्कम व भेटवस्तू देऊन जिल्हा शिक्षक बँकेचे व्हा. चेअरमन विजयराव बनसोडे यांचे हस्ते अहिंसा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी संस्थेचे संचालक महावीर होरा, विजय बनगर, बाळासाहेब सरतापे, व्यवस्थापक दीपक मासाळ, अजित गांधी सौ. राणी डोंगरे यांचे सह अहिंसा परिवारातील सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्र संचालन श्री अक्षय धट यांनी केले आभार निरज व्होरा यांनी मानले.
Web Title: Shashikant mhmane honored with ahimsa award nrab