कराड : वेदांता प्रकल्पाकरिता महाराष्ट्र राज्य (Maharashtra State) प्रथम पसंतीचे होते. तसा सर्च रिपोर्टही होता. परंतु, राज्यातील शिंदे- फडणवीस (Shinde- Fadanvis) सरकारचा गाफीलपणा महाराष्ट्राच्या मुळावर उठला आहे. मोदींचा (Narendra Modi) ओढा गुजरातकडे (Gujrat) असल्याने हा प्रकल्प गुजरातला गेला. त्यामुळे महाराष्ट्राची मोठी हानी झाली, अशी टीका माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केली.
बाळासाहेब पाटील म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्योग मंत्री उदय सामंत हे दोघेही महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते. वेदांता प्रकल्प हा त्यावेळचा विषय. या प्रकल्पासंदर्भातील सर्च रिपोर्टमध्ये सुद्धा या प्रकल्पासाठी महाराष्ट्रालाच पसंती होती. मोदींच्या गुजरात प्रेमापोठी हा प्रकल्प इतर कोणत्याही राज्यात न जाता गुजरातला गेला. दुसर्या मोठ्या प्रकल्पाचे आश्वासन देवून सरकारची बोळवण केली आहे.
लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी या सरकारने अधिक वेळ दिला पाहिजे. लंपी सारख्या आजाराचा प्रादुर्भाव वाढत असताना अजून पालकमंत्र्यांच्या नियुक्या झालेल्या नाहीत. सरकारचा कारभार गतिमान करण्यासाठी मंत्रिमंडळ विस्तार आवश्यक आहे. पण त्याकडे कोणी गांभीर्याने पाहत नसल्याची खंत पाटील यांनी व्यक्त केली.
[read_also content=”दरोड्यातील तीन आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई https://www.navarashtra.com/maharashtra/three-accused-in-robbery-jailed-action-by-local-crime-branch-nrdm-326956.html”]
…तर आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका नजीकच्या काळात होऊ घातल्या आहेत. न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे सोसायटी संचालक व ग्रामपंचायत सदस्य हेच त्याचे मतदार असतील असे वाटते. पण या सरकारने जर सर्व शेतकर्यांना याचे मतदार करून निवडणुका घेण्याचा प्रयत्न केला तर ते बाजार समित्यांना आर्थिक दृष्ट्या परवडणारे नाही. असे मतही माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना व्यक्त केले.