मुंबई : सध्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी (presidential election 2022) भाजप व विरोधीपक्षाकडून जोरदार तयारी सुरू आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणूक 18 जुलैला होणार आहे. (presidential election 18 July) भाजपाकडून एनडीएकडून द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर, विरोधी पक्षाकडून यशवंत सिन्हा (Yashwant sinha) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेना नक्की कोणाला पाठिंबा देणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते. त्यासंदर्भात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे. शिवसेना द्रौपदी मुर्मू यांनाच पाठिंबा देणार असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. राष्ट्रपतीसाठी शिवसेनेनं नेहमीच वेगळी भूमिका घेतली असल्याचं उद्धव ठाकरेंनी आजच्या पत्रकार परिषद सांगितले. (Uddhav Thackeray press conference)
[read_also content=”विरोधीपक्षनेते अजित पवारांनी घेतला राज्यातील पूरस्थितीचा आढावा https://www.navarashtra.com/maharashtra/leader-of-opposition-ajit-pawar-took-stock-of-the-situation-in-the-state-303523.html”]
दरम्यान, राष्ट्रपतीपदाच्या एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेने पाठिंबा देणार की नाही यावर बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरु होती. अखेर आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत, राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला आहे. (Shivsena supports Droupadi Murmu in president election) राष्ट्रपतीपदाच्या निवडीसंदर्भात शिवसेनेने नेहमीच वेगळी भूमिका घेतली आहे. मी कोत्या मनाचा नाही. आदिवासी समाजाच्या अनेक नेते-कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांचे फोन आल्यानंतर प्रेमाच्या आग्रहाखातर आम्ही मूर्मू यांना पाठिबा देण्याचा निर्णय घेतल्याचं उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
कोण आहेत द्रौपदी मुर्मू?
द्रौपदी मुर्मू या झारखंडच्या माजी राज्यपाल आहेत. पूर्व भारतातील महिला आणि आदिवासी उमेदवार देण्याचा निर्णय घेतल्याचं नड्डा यांनी सांगितलं. मुर्मू या ओडिशा राज्यातील आहेत. द्रौपदी मुर्मू या स्वतंत्र भारतातील पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती होण्याची शक्यता आहे. २०१७ मध्ये देखील द्रौपदी मुर्मू यांचं नाव चर्चेत होतं. मात्र, भाजपनं त्यावेळी रामनाथ कोविंद यांना उमेदवारी दिली होती.