शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांचा बीएमसी आरक्षण सोडतीवर आक्षेप घेतला (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई महापालिका महापौर आरक्षण सोडतीवर ठाकरे गटाने आक्षेप घेतला आहे. माजी महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, मुंबईमध्ये ओबीसी महिला आत्तापर्यंत महापौर झालेली नाही. 2019 आणि 2022 मध्ये ओपन होतं. यावेळी तरी ओबीसी यायला हवं होतं. ओबीसींवर अन्याय करण्यात आला आहे. शेड्युल कास्ट किती असायला पाहिजे? आता नियम बनवला की शेड्युल ट्राईब तीन असायला पाहिजे. मात्र बीएमसीमध्ये आरक्षण सोडत ठरवून केली असल्याचा आरोप किशोरी पेडणेकर यांनी केले आहे.
हे देखील वाचा : मुंबईत महिला राज! BMC मध्ये सर्वसाधारण महिला महापौर आरक्षण सोडत जाहीर
पुढे त्या म्हणाल्या की, “आदिवासी प्रवर्ग (ST) का वगळला? किशोरी पेडणेकर यांनी सर्वात मोठा प्रश्न ‘एसटी’ प्रवर्गाबाबत विचारला. मुंबई महापालिकेत अनुसूचित जमातीचे (ST) दोन नगरसेवक निवडून आले आहेत. मग आरक्षणाची चिठ्ठी काढताना हा प्रवर्ग का वगळण्यात आला? महायुतीकडे या प्रवर्गाचे नगरसेवक नाहीत म्हणून हा जाणीवपूर्वक केलेला प्रकार आहे का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. जाणीवपूर्वक आदिवासी प्रवर्गाला वगळण्यात आले. अचानकपणे आदिवासी प्रवर्गासाठी किमान तीन जागांचा नियम केला असल्याचा आरोप किशोरी पेडणेकर यांनी केला. सत्ताधाऱ्यांना मिळालेल्या जागांच्या आधारेच लॉटरी काढण्यात आल्याचा आरोप पेडणेकर यांनी केला.
हे देखील वाचा : २९ महानगरपालिकासांठी महापौर आरक्षण सोडत जाहीर, तुमच्या शहराचा महापौर कोण? वाचा संपूर्ण यादी
कोणत्या महापालिकेमध्ये कोणता महापौर? वाचा यादी
आरक्षणाचे गणित






