कोंढापुरीतील सहा महिला पर्यटक पहलगामला अडकल्या होत्या (फोटो - टीम नवराष्ट्र)
शिक्रापूर : जम्मू काश्मीरमध्ये दहशदवादी हल्ला करुन अशांतता निर्माण करण्यात आली आहे. पहलगाम भागात भीषण दहशतवादी हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात हिंदू पर्यटकांना लक्ष्य करण्यात आले. यामध्ये आतापर्यंत 28 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सहा महाराष्ट्रातील पर्यटकांचा समावेश आहे. या घटनेचे तीव्र पडसाद आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील पडत आहेत. या हल्ल्यानंतर 150 पर्यटक अडकले आहेत. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या हल्ल्यात काही पर्यटकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली असताना महाराष्ट्रातील गेलेल्या पर्यटकांचे कुटुंबीय चिंतेत आहेत. शिरुर तालुक्यातील कोंढापुरी येथील देखील सहा महिला पर्यटक तेथे अडकल्याने कुटुंबीय चिंतेत होते. मात्र जम्मू काश्मीरमध्ये या सर्व महिला सुरक्षित असल्याने गायकवाड कुटुंबियांना दिलासा मिळाला आहे.
कोंढापुरी तालुका शिरुर येथील भास्कर गायकवाड यांच्या पत्नी मनीषा गायकवाड, बहिणी तेजल गायकवाड, दिपाली गायकवाड, बहीण ललिता आदक तसेच मामाच्या मुली दिपाली लोखंडे व रुपाली तांबे या सर्व महिला पर्यटक 15 एप्रिल रोजी पर्यटनसाठी काश्मीर येथे गेल्या होत्या. त्या 25 एप्रिल रोजी पुन्हा घरी परतणार होत्या, मात्र 22 एप्रिल रोजी काश्मीर येथे पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. यामध्ये अनेक पर्यटक मृत पावले याबाबतची माहिती प्रसारित होताच गायकवाड कुटुंबीयांनी त्यांच्या महिलांना संपर्क केला मात्र संपर्क होत नसल्याने सर्वजण भयभीत झाले. त्यांनतर आज सकाळच्या सुमारास भास्कर गायकवाड यांचे त्यांच्या कुटुंबातील महिलांशी संपर्क होताच सर्व महिलांनी आम्ही येथील श्रीनगरमध्ये सुरक्षित असून सध्या येथे तणाव आणि सर्व सुविधा बंद असल्याचे सांगितले.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
दरम्यान भास्कर गायकवाड यांनी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष जयेश शिंदे यांना याबाबत माहिती देताच जयेश शिंदे केंदीय हवाई मंत्री मुरलीधर मोहोळ व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून मदतीची मागणी केली. यावेळी सकारात्मक प्रतिसाद देत उद्या (दि.24) स्वतंत्र विमानाने सर्व पर्यटकांना आणण्यात येणार असल्याचे केंदीय हवाई मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितल्याने गायकवाड कुटुंबियांने समाधान व्यक्त केले.
पहलगाम दहशदवादी हलल्यासंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
कोंढापुरी ता. शिरुर येथील पहलगाममध्ये अडकलेले पर्यटकांशी संवाद साधला असता ते म्हणाले की, “आमच्या कुटुंबियांशी समाचा संपर्क होत नसल्याने प्रथम आमची चिंतेत होतो, मात्र सकाळी आमचा संपर्क झाल्याने नक्कीच आनंद झालेला असून आम्हाला जयेश शिंदे यांनी मोठी मदत केली आणि उद्या आमच्या कुटुंबातील महिला घरी येणार असल्याबाबतची माहिती आम्हाला मिळाली असल्याने समाधान वाटत आहे असे भास्कर गायकवाड यांनी सांगितले आहे.
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या घटनेनंतर सातत्याने परिस्थितीचा आढावा घेत आहेत. पुण्यातील दोन पर्यटकांचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला आहे. दरम्यान हल्ल्यानंतर जे पर्यटक तिथे अडकले आहेत, त्यांना सुखरूप आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पुण्यातील 150 पर्यटक अडकले आहेत. श्रीनगर ते दिल्ली विशेष विमानाने त्यांना आणण्यात येईल, आज शक्य झालं नाही तर, उद्या त्यांना सर्वांना आणू, असं आश्वासन खासदार मोहोळ यांनी दिले आहे.