पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानची धाकधूक वाढली (फोटो- istockphoto)
श्रीनगर: काल पहलगाम येथे सैनिकी गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी बैसरन खोऱ्यात पर्यटकांवर हल्ला केला होता. यामध्ये २८ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. काही पर्यटक महाराष्ट्रातील देखील या घटनेत मृत्युमुखी पडले आहेत. दरम्यान काल झालेल्या हल्ल्याची जबाबदारी टिआरएफने स्वीकारली आहे. दरम्यान या हल्ल्यानंतर पाकिस्तानची धावपळ सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. भारत रात्रीच हल्ला करतो की के आशा भीतीपोटी पाकिस्तान एअरफोर्स रात्रभर सीमेजवळ अलर्ट मोडवर असल्याचे म्हटले जात आहे.
उरी आणि पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये घुसून भारताने प्रत्युत्तर दिले होते. पहलगाम हल्ल्याचे कनेक्शन पाकिस्तानशी जोडले जात आहे. त्यामुळे आता पाकिस्तानची धाकधूक वाढली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानचे सैन्य अलर्ट मोडवर गेले आहे. पाकिस्तानची एअरफोर्स हाय अलर्ट मोडवर आहे.
पाकिस्तान एअरफोर्सची विमाने सातत्याने सीमेजवळ गस्त घालत आहेत असे समजते आहे. भारत बालाकोट प्रमाणे काही कारवाई करणार का अशी भीती पाकिस्तानला सतावत आहे. त्यामुळे पाकिस्तानची सैन्य दले अलर्ट मोडवर आहेत. पाकिस्तान सैन्य दले सावध पवित्रा घेतान दिसून येत आहेत.
तर दुसरीकडे भारताने या हल्ल्याची गंभीर दाखल घेतली आहे. भारतीय लष्कराने संपूर्ण पहलगाममध्ये सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. मोठ्या प्रमाणात जम्मू काश्मीर पोलिस, सीआरपीएफ आणि सैन्य दल त्या ठिकाणी शोधमोहीम घेत आहेत. हल्ला केलेल्या दहशतवाद्यांची माहिती, फोटो जाहीर करण्यात आले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राजनाथ सिंह आणि अन्य नेत्यांनी महत्वाच्या बैठक घेतल्या आहेत. आज संध्याकाळी महत्वाची बैठक होणार आहे. राजनाथ सिंह यांनी तीनही सैन्य प्रमुखांशी चर्चा केली आहे. अमित शहा यांनी पहलगाममध्ये घटनास्थळाची पाहणी केली आहे.
या दहशतवादी हल्ल्यासाठी स्थानिक स्लीपर सेलचा वापर करण्यात आल्याचे समोर आले आहे. या ठिकाणी हल्ला करण्याआधी या परिसराची रेकी देखील दहशतवाद्यांनी केले असल्याचे समजते आहे. तसेच या भ्याड हल्ल्याचा कट पाकिस्तानच्या रावळपिंडी येथे रचण्यात आला असे प्राथमिक माहिती समोर येत आहे.
Pahalgam Terror Attack: किती धोकादायक आहे ‘TRF’ संघटना? दहशतवाद्यांचे लादेन कनेक्शन? वाचा सविस्तर…
किती धोकादायक आहे ‘TRF’ संघटना?
काल झालेल्या हल्ल्याची जबाबदारी टिआरएफने स्वीकारली आहे. टीआरएफ (द रेजिडेंट फ्रंट) ही पाकिस्तानी दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा असल्याचे मानले जाते. दरम्यान या दहशतवादी संघटनेबद्दल जाणून घेऊयात. इंडियन मुजाउद्दीन आणि लष्कर ए तोयबा यांच्यामधून टीआरएफ दहशतवादी संघटना तयार करण्यात आली आहे. या संघटनेचे काम काश्मीरमधील युवकांना सीमारेषेच्या पलीकडे पाठवून त्यांना गोरील्ला लढाईचे ट्रेनिंग देणे हे आहे. टीआरएफच्या संस्थापकांमध्ये हाफिज मुहम्मद सईद, झकीउर रहमान लखवी आणि काश्मीरचे रहिवासी शेख सज्जाद गुल यांचा समावेश आहे.