औरंगाबाद : शहरातील नागरिकांना पाण्याचा वेळा ची माहिती आधीच पुरवण्यासाठी औरंगाबाद स्मार्ट सिटी ने ‘जल – बेल’ हे ॲप लॉन्च केले आहे. या ॲप मुळे शहरातील पाणीपुरवठ्याची सर्व माहिती एका क्लिक वर नागरिकांच्या हातात असेल. यामुळे नागरिकांना त्यांच्या भागात येणाऱ्या पाण्याचे वेळापत्रक आधीच उपलब्ध होईल.
मनपा आयुक्त व प्रशासक आणि स्मार्ट सिटी चे सीईओ आस्तिक कुमार पाण्डेय यांचा मार्गदर्शनाखाली औरंगाबाद महानगरपालिकेची पूर्ण यंत्रणा उन्हाळ्यात पाण्याची अतिरिक्त मागणीला लक्षात घेऊन पाऊल उचलत आहे. विविध उपाययोजना करून शहरातील येणाऱ्या पाण्याची आवक दहा ते पंधरा एमएलडी पर्यंत वाढवली जात आहे. याशिवाय पाण्याची चोरी, पाण्याचा अपव्यय व अनधिकृत रित्या झडपांची हाताळणी हे थांबून जास्तीत जास्त पाण्याची बचत करण्यात येत आहे जेणेकरून शहरातील सर्व भागांना सुरळीत पाणीपुरवठा करता येईल.
या दृष्टीनेच एक पाऊल म्हणून औरंगाबाद स्मार्ट सिटीने जल – बेल हे ॲप लॉन्च केला आहे. औरंगाबाद स्मार्ट सिटी व औरंगाबाद महानरपालिकेने एक्सपिका डेव्हलपर या स्टार्टअप द्वारे निलेश लोणकर आणि अक्षय कुलकर्णी यांच्याद्वारे ॲप तयार करून घेतलं आहे. मंगळवारी स्मार्ट सिटी चे सीईओ अस्तिक कुमार पांडेय यांनी स्मार्ट सिटी चे अतिरिक्त अरुण शिंदे, प्रकल्प अभियंता फैज अली, प्रकल्प सहयोगी किरण आढे व अन्य अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीत हा ॲप औरंगाबाद स्मार्ट सिटी च्या कार्यालयात लॉन्च केला.
यावेळेस पांडेय म्हणाले की जल बेल लवकरच पूर्ण शहराच्या नागरिकांसाठी उपलब्ध असेल. मनपाची पाणीपुरवठ्याचे लाईन मॅन, व्हॉल्व ऑपरेट करणारे, अभियंता व अधिकारी ह्यांच्याशी समन्वय साधून हा ॲप चालवला जात आहे. ह्याचामुळे प्रशासनाला सुद्धा पाणी पुरवठा वर बारकाईने निगराणी ठेवता येईल, असे ते म्हणाले.
जल बेल ॲप चे फायदे
जल बेल ॲप द्वारे नागरिकांना त्यांच्या भागात येणाऱ्या पाण्याची वेळ, दिनांक, पाण्याचा कालावधी यांची माहिती देणारे एक नोटिफिकेशन मिळेल. यामुळे नागरिकांना त्यांच्या भागात कधी पाणी येतंय याची माहिती मिळत राहील. पाणी येण्याच्या थोडा वेळ आधी देखील या ॲप द्वारे नागरिकांना अलर्ट मिळेल. त्याचबरोबर महिनाभरात कधी पाणी आले याचे वेळापत्रक देखील या ॲप वर असेल. या वेळापत्रकात पाण्याचा दिनांक, वार, वेळ आणि कालावधी यांची नोंद असेल. यामुळे नागरिकांना पाण्याचे नियोजन करणे शक्य होईल. पाणी येण्यासाठी एक मिनिट जरी उशीर होणार असेल तरी देखील हे ॲप वापरकर्त्याला अलर्ट देईल. या ॲप च्या माध्यमातून नागरिकांना पाण्याविषयी तक्रारी देखील नोंदवता येऊ शकतील.
या ॲपचा डेमो म्हाडा कॉलनीत घेण्यात आला होता आणि हा डेमो यशस्वी देखील ठरला आहे. हे ॲप अँड्रॉइड वर गूगल प्ले स्टोअर वरती उपलब्ध आहे.
ॲप ची हाताळणी सोपी व सुलभ
पाणीपुरवठयाबद्दल माहिती नागरिकांपर्यंत पोहोचण्यात अडथळे येत होते. मात्र या ॲप मुळे नागरिकांना त्यांच्या भागातील आणि संपूर्ण शहरातील पाण्याचे वेळापत्रक आधीच हजर असेल. आणि यासाठी त्यांना अलर्ट देखील मिळेल. काही कारणास्तव पाणी उशिरा येणार असेल किंवा येणार नसेल तर त्यासाठी देखील अलर्ट मिळेल. या अलर्ट मध्ये पाणी न येण्याची किंवा उशिरा येण्याची कारणे देखील दिसतील. त्याचबरोबर पाणी नागरिकांपर्यंत कसं पोहोचत, याची माहिती देखील या ॲप मध्ये असेल. पोलिस, अग्निशमन, गॅस, महिला हेल्पलाईन यांसारखे इमर्जंसी संपर्क, हेल्पलाईनचा देखील यात समावेश आहे. याचबरोबर स्मार्ट सिटी आणि मनपाची माहिती देखील या ॲपच्या माध्यमातून नागरिकांना मिळेल.
या ॲपची साइज कमी आहे आणि हे वापरकर्त्यांसाठी वापरण्यास सोपे आणि सुलभ आहे. नागरिकांना भाषा बदलण्याचा देखील पर्याय यात उपलब्ध आहे. पाणीपुरवठा विभागाच्या लाईनमनला संपर्क साधुन या ॲप वर माहिती देण्यात येते. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठ्याची योग्य माहिती नागरिकांपर्यंत पोहोचू शकेल. या ॲपमुळे नागरिकांना आधीच अलर्ट मिळाल्यामुळे पाणी वाचवणे, बाहेर जाण्याचे प्लॅनिंग करणे शक्य होईल. वर्किंग कपल्स साठी हा ॲप खूप फायदेशीर ठरणार आहे. या ॲप मुळे कामावर जाणारे नागरिक, विशेषतः महिला वर्ग यांना मोठा दिलासा मिळेल. याचा फायदा मोठ्या प्रमाणात सर्व नागरिकांना होईल. शहरातील पाण्याची सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध होईल. यामुळे शहरातील पाण्याची तक्रार कमी होईल.
[read_also content=”कोविड-१९ मुळे छत्र हरपलेल्या ११ बालकांना ५ लाख रुपयांच्या मुदत ठेवींचे संरक्षण https://www.navarashtra.com/maharashtra/protection-of-term-deposit-of-rs-5-lakhs-to-11-children-who-lost-their-umbrella-due-to-kovid-19-nrdm-281155.html”]
सध्या एन 5 च्या टाकी वर अवलंबून असणारे भागांसाठी सक्रिय
N-5 स्थित पाण्याची टाकी वरून पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या भागासाठी जल बेल आता लाईफ झाला आहे. खाली दिलेल्या भागांत राहणारे नागरिक हा ॲप डाऊनलोड करून याचा वापर करायला सुरुवात करू शकता.
चिकलठाणा [वॉर्ड क्र. ८८,८९]
चौधरी कॉलनी [वॉर्ड:३७]
म्हाडा कॉलनी [वॉर्ड क्र.८७,८८]
म्हसनतपुर [वॉर्ड:३८]
संजयनगर [वॉर्ड:८५]
नारेगाव [वॉर्ड:३६]
मथुरानगर [वॉर्ड: ४०,६४]
एन १ ए/बी सेक्टर [वॉर्ड : ३८]
एन-६ साईनगर/शुभश्री कॉलनी [वॉर्ड : ६३]
एन१ टाऊन सेंटर सिडको बस स्टँड मघील [वॉर्ड :६५ ]
एन ६ शिवजोति कॉलनी एफ [वॉर्ड : ६२]
आविष्कार कॉलनी [वॉर्ड : ६३]
उत्तरनगरी [वॉर्ड:३६]
एन ८ गणेशनगर [वॉर्ड:४०]
एन ६ सिडको [वॉर्ड:६४]
एन ५ साऊथ | एन७ के सेक्टर [वॉर्ड:६४,४०]
गुलमोहर कॉलनी [वॉर्ड:६४]
ब्रिजवाडी [वॉर्ड:३६]
संघर्षनगर | विट्टलनगर [वॉर्ड: ८५,८७]
एन-३ सिडको [वॉर्ड:८०]
एन-२ सिडको [वॉर्ड:८१]
ठाकरे नगर [वॉर्ड:८१]
एन-४ सिडको [वॉर्ड: ८०]
जयभवानीनगर [वॉर्ड:९१]
संतोषीमाता नगर [वॉर्ड:८२]
रामनगर [वॉर्ड:८५,८६]
राजीव गांधी नगर [वॉर्ड:८१,८२]
मुकुंदवाडी [वॉर्ड:८२,८३,८४]
संजयनगर [वॉर्ड क्र:८५]