संग्रहित फोटो
गेल्या वर्षभरात आमदार मनोज घोरपडे यांनी कामाचा प्रभावी धडाका लावला असून, त्यांनी सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळून जनसंपर्क करत अनेकांना प्रभावित केले आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक सोसायटी संचालक, चेअरमन आणि ग्रामपंचायत सदस्य भाजपात प्रवेश करत आहेत.
या प्रवेशात सहभागी प्रमुख व्यक्ती :
संजय जाधव (पॅनल प्रमुख), नथुराम पाटील (चेअरमन), शहाजी पाटील, संभाजी जाधव, युवराज जाधव (संचालक), विश्वनाथ जाधव (माजी चेअरमन) धर्मेंद्र जाधव, शंकर जाधव, तानाजी चव्हाण, अरुण पवार, अशोक खरात, वसंत जाधव, उत्तम जाधव, सरंग जाधव, विलास भाऊजी, मोहन जाधव, अनिकेत जाधव, तेजस जगदाळे, बाजीराव जाधव, तुषार जाधव, भिकाजी जाधव, संदीप जाधव, शंकर पाटील आदी. यांचा समावेश आहे.
“भारतीय जनता पार्टीत आपले सर्वांचे स्वागत आहे. केंद्र आणि राज्यात भाजप सरकार असल्यामुळे विकासासाठी कुठेही अडचण येणार नाही. आपल्या गावातील जुने सहकारी आणि सर्वांचा समन्वय साधून योग्य सन्मान राखला जाईल.” -आमदार मनोज घोरपडे






