वाढत्या अपेक्षा आणि बदलती सामाजिक परिस्थितीमुळे मुलीच्या शिक्षणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम व आत्मनिर्भर होत आहेत, ही बाब समाजासाठी निश्वितव सकारात्मक आहे. मात्र विवाहाच्या बाबतीत नोकरी, मासिक उत्पन्न, स्वतःचे घर, शेती, वाहन आणि सामाजिक प्रतिष्ठा यांसारख्या बाबींमध्ये अपेक्षा प्रचंड वाढल्या आहेत. याचा फटका ग्रामीण भागातील तरुणांना बसत असून अनेक तरुणांचे वय निघून जात आहे. काही तरुण घटस्फोटीत किंवा विधवा महिलांशी विवाह करण्यासही तयार असतानाही नोकरी मालमत्तच्या अटीमुळे विवाह जुळत नसल्याची उदाहरणे वाढत आहेत.
यामुळे जातीअंतर्गत विवाह करणे अधिक कठीण होत बालले असून अनेक कुटुंबांसमोर आंतरजातीय विवाह हाच पर्याय उरत असल्याचे जाणकारांचे मत आहे. लग्न जमवण्यासाठी वधू-वर सूचक मंडळांचा वाढते व्यवसायीकरण झाले आहे पूर्वी विवाह जुळवण्यात नातेवाईक, गावकरी व सामाजिक संबंध महत्त्वाची भूमिका बजावत असत. मात्र आता या जागी वधू-वर सूचक मंडळांनी मोठ्या प्रमाणात प्रवेश केला आहे. करमाळा तालुक्यातील अनेक सूचक मंडळांकडून स्थळ दाखवण्यासाठी 5 ते 10 हजार रुपयांची फी घेतली जाते, तर विवाह जुळल्यास लग्न लावून देण्यासाठी 2 ते 3 लाख रुपयांपर्यंत रक्कम मागितली जात असल्याच्या तक्रारी मुलांच्या पालकांकडून करण्यात येत आहेत. त्यामुळे मध्यमवर्गीय च सर्वसामान्य कुटुंबांवरील आर्थिक ओझे वाढत आहे.
सामाजिक जाणकार आणि ज्येष्ठ नागरिकांनी मुलींच्या पालकांना अवास्तव अपेक्षा न ठेवण्याचे आवाहन केले आहे. प्रामाणिक, कष्टाळू, चारित्र्यसंपन्न आणि जबाबदार व्यावसायिक तरुणांना संधी दिल्यास अनेक संसार सुखी होऊ शकतात, असे मत व्यक्त केले जात आहे. केवळ स्थावर मालमत्तेच्या मोहापायी निर्णय घेतल्यास भविष्यात हुंडा छळ आणि हुंडाबळीच्या घटनांची शक्यता वाढू शकते, असा इशाराही देण्यात येत आहे.
Ans: सरकारी नोकरीचा अभाव, स्थिर उत्पन्न नसणे, वाढती आर्थिक अपेक्षा, शेतीतील अनिश्चितता आणि बदलती सामाजिक मानसिकता यामुळे अनेक तरुणांचे विवाह जुळत नाहीत.
Ans: करमाळा तालुक्यातील जवळपास प्रत्येक गावात 30 वर्षांहून अधिक वयाचे 100 ते 150 युवक अजूनही अविवाहित असल्याचे आढळते.
Ans: अनिश्चित पाऊस, नैसर्गिक आपत्ती, वाढता उत्पादन खर्च आणि बाजारभावातील चढउतार यामुळे शेतीतून स्थिर उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे विवाहासाठी आवश्यक मानला जाणारा “स्थिर उत्पन्नाचा दाखला” तरुणांकडे नसतो.






