मंगळवेढा : दुचाकी पोलीस पाटलाकडे ठेवल्याच्या कारणावरुन एका 55 वर्षीय महिलेस (Son Beaten to Mother) तिच्या मुलाने गंभीर मारहाण केल्याची घटना घडली. आरोपी मुलाने केसाला धरुन, खाली पाडून दगडाने मारुन गंभीर जखमी केले. याप्रकरणी मुलगा महादेव सिध्दू लेंगरे (रा.सलगर खु॥) याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी कमलाबाई सिध्दू लेंगरे (वय 55) या 12 मे रोजी सायंकाळी 6 वाजता सलगर येथे राहते. घरासमोर जनावरे बांधत असताना त्यांचा मुलगा महादेव सिध्दू लेंगरे याने जवळ येऊन कमलाबाई यांना म्हणाला, ‘माझी दुचाकी तू पोलीस पाटील यांना सांगून त्यांच्याकडे का ठेवली?’ असे म्हणून शिवीगाळ करत फिर्यादीच्या केसाला धरुन खाली पाडले.
तसेच तोंडावर बुक्क्या मारुन, दगड घेऊन हाताच्या कोपर्यावर मारल्याने फिर्यादी गंभीर जखमी झाल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याचा अधिक तपास सहायक फौजदार हिप्परकर हे करीत आहेत.