मुंबई : सध्या राज्यात राजकीय वातावरण तापले असताना, राज्यात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. दरम्यान, शिवसेनेचे नेते व मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आता जवळपास 44 आमदारांना (MLA) घेऊन गुहावटीत (Guhawati) येथे थांबले आहेत. आज एकनाथ शिंदे तसेच त्यांचा बंडाळी गट उद्या मुंबईत दाखल होणार आहे. शिंदे गटानी आपल्या गटाचे ‘शिवसेना बाळासाहेब गट’ (Shivsena balasaheb Group) असे नाव ठेवले आहे. त्यामुळं राज्यातील राजकीय हालचालीना वेग आला असून, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांच्यात बैठकीचं (Shivsena, congress, and NCP Meeting) जोरदार सत्रं सुरु आहे. आजच्या मविआच्या बैठकीत शिवसेनेच्या नेत्यांनी दांडी मारल्यामुळं शंकेची पाल चुकचुकली असून, मविआचे टेन्शन वाढले आहे.
[read_also content=”एकनाथ शिंदे उद्या मुंबईत दाखल होणार, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला भेट देणार https://www.navarashtra.com/maharashtra/eknath-shinde-will-arrive-in-mumbai-tomorrow-to-visit-balasaheb-memorial-298483.html”]
दरम्यान, दुसरीकडे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadnvis) यांनी मंगळवारी रात्री, राज्यपाल भगत सिंह कोशारी (Bhagat singh koshayri) यांना पत्र लिहिले होते. त्यानुसार, त्यांनी महाविकास आघाडीला बहुमत सिद्ध कऱण्याची मागणी केली होती. याविरोधात शिवसेनेनं सर्वोच्य न्यायालयाच याचिका दाखल केली असून, त्यावर आज सांयकाळी 5.30 वाजता सुनावणी पार पडणार आहे. सरकार राहणार की जाणार अशी परिस्थिती असताना, आता महाविकास आघाडीतील महत्त्वाच्या नेत्यांच्या बैठकीत (MVA Meeting) होत असून, आज शरद पवारांच्या (Sharad Pawar) अध्यक्षखाली मविआची बैठक पार पडली असून, दुसरीकडे काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधींनी (Sonia Gandhi call to CM) मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन करुन धीर दिला आहे, “तुम्ही घाबरु नका आम्ही तुमच्या सोबत आहोत असं फोनवरुन सोनिया गांधींनी उद्धव ठाकरेंना दिलासा दिला आहे.” (Sonia Gandhi call to Chief Minister Uddhav Thackeray don’t be afraid we are with you)
सरकारला बहुमत सिद्ध करायचे आहे असं असताना, सोनिया गांधी उद्धव ठाकरेंना फोन करुन दिलासा दिला आहे. “आम्ही सोबत आहोत, घाबरण्यासारखं काही नाही. वेळ आल्यास तुम्हाला बाहेरून पाठिंबा देऊ असंही सांगितले आहे. शिवसेनेत स्थिरता राहावी असा काँग्रेसचा प्रयत्न आहे.” दरम्यान, शिवसेनेनं न्यायायलयात दाखल केलेल्या याचिकेवर सांयकाळी 5.30 वाजता सुनावणी पार पडणार आहे.