पिंपरी – पिंपरी-चिंचवड (Pimpari) आणि परिसरातील औद्योगिक वसाहतीमधील लघु उद्योजकांच्या प्रलंबित समस्या सोडवण्याबाबत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सकारात्मक भूमिका घेतली असून, संघटनेचे पदाधिकारी आणि उद्योजक प्रतिनिधी यांची दि. १९ नोव्हेंबर २०२२ रोजी बैठक घेण्यात येणार आहे. त्यामुळे लघु उद्योजकांना दिलासा मिळाला आहे. पिंपरी-चिंचवड ऑटो क्लस्टर येथे सुरू असलेल्या ‘‘पुणे म्यॅनुफॅक्चरींग एक्पो- २०२२’’ (Pune Manufacturing Expo) प्रदर्शनाला राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी नवोदित उद्योजकांसोबत त्यांची चर्चा केली.
[read_also content=”राज्यातील पायाभूत सुविधा प्रकल्पांना एडीबी बँकेने सहाय्य करावे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन https://www.navarashtra.com/maharashtra/cm-eknath-shinde-appeals-to-adb-bank-should-support-infrastructure-projects-in-maharashtra-342615.html”]
दरम्यान, पिंपरी-चिंचवड लघु उद्योग संघटनेच्या विविध मागण्यांसदर्भात मंत्री महोदय यांना निवेदन दिले. लघु उद्योग संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने उद्योजकांना पाठविलेल्या एलबीटी नोटीसा रद्द कराव्यात. एम.आय.डी.सीच्या जागेवर उभ्या राहणाऱ्या अनाधिकृत झोपडपट्टी हटवण्यात याव्यात. भुयारी गटार योजना व सी.इ.टी.पी.प्लांट उभारण्यासाठी नियोजन करावे. एम.आय.डी.सी मधील मैला वाहून नेण्याची निशुल्क व्यवस्था करावी. औद्योगिक परिसरातील कचरा समस्या सोडवण्यात यावी. अनधिकृत भंगारची दुकानांवर कारवाई करावी. अनधिकृत माथाडी कामगार संघटनांना प्रतिबंध करावा. औद्योगिक परीसरातील अग्निशमन केंद्राचा प्रश्न अनेक दिवस प्रलंबित असून, तो तातडीने मार्गी लावण्यात यावा. औद्योगिक पट्टयात पीएमपी बस सुविधा, सार्वजनिक शौचालय उभारणी तसेच पायाभूत सुविधा उपलब्ध कराव्यात अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.