result (फोटो सौजन्य- social media)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी- बारवीची परीक्षा घेण्यात आली होती. आता सगळ्यांना आतुरता आहे ते म्हणजे निकालाची. विध्यार्थ्यांच्या निकालाबद्दल एक महत्वाची माहिती समोर आली आहे. १० वी- १२वीच्या विद्यार्थांचा लवकरच निकाल लागणार आहे.
एम्स विलासपूर मध्ये वरिष्ठ निवासी पदासाठी भरती; थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया
यावर्षी 11 फेब्रुवारी ते 18 मार्च पर्यंत 12 वीची परीक्षा झाली होती. तर इयत्ता 10 वी ची परीक्षा 21 फेब्रुवारी रोजी सुरू झाली ती 17 मार्चपर्यंत होती. यंदा एकूण 15 लाख 5 हजार 37 विद्यार्थ्यांनी 12वीची परीक्षा दिली. 3 हजार 373 परीक्षा केंद्रावर ही परीक्षा पार पडली.
मिळालेल्या माहितीनुसार, मे महिन्यात या दोन्ही परीक्षांचा निकाल जाहीर होणार आहे. मे महिन्यात पहिल्या आठवड्याला बारावीचा, तर दुसऱ्या आठवड्याला दहावीचा निकाल जाहीर होणार अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे देण्यात आली. या निकालाच्या तारखा लवकरच जाहीर केल्या जातील असेही बोर्डाकडून सांगण्यात आले. १५ मे पर्यंत निकाल लागू शकतो. आता यामुळे विध्यार्थी आणि त्यांच्या पालकांची धडधड वाढली आहे.
या हेतूने बोर्डाने लवकर जाहीर करण्याचा निर्णय
विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेसाठी पुरेसा वेळ मिळावा, या हेतूने बोर्डाने यंदाच्या वर्षी परीक्षा आधीच घेतल्या आणि निकालही लवकर जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता मे महिना संपायच्या आतच दोन्ही (10वी , 12वी) इयत्तांचे निकाल लागणार असून त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश प्रक्रियेसाठीही पुरेसा वेळ मिळेल. लवकर निकाल जाहीर झाल्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रियेला वेळेवर सामोरे जाण्यास मदत होणार आहे. यापूर्वी, निकाल उशिरा लागत असल्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील वर्षीची प्रवेश प्रक्रिया आणि पुरवणी परीक्षांसाठी कमी वेळ मिळत असे. मात्र यंदा तसे होणार नाही.
कुठे पाहू शकता निकाल ?
mahahsscboard.in
mahresult.nic.in
hscresult.mkcl.org
msbshse.co.in
mh-ssc.ac.in
sscboardpune.in
sscresult.mkcl.org
hsc.mahresults.org.in
मेंढ्यांना चारण्यासाठी गेला असता कानी आली गोड बातमी! राज्यभरात नाव करणारा बिरदेव आहे तरी कोण?