मुंबई: राज्य निवडणूक आयोगाचा (State Election Commission) मोठा निर्णय समोर आला आहे. राज्यातील ९२ नगर परिषदा आणि चार नगरपंचायतीमधील सार्वत्रिक निवडणुका स्थगित (Stay On Election) करण्यात आल्याचं निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आलं आहे. (Maharashtra Election 2022) निवडणूक आयोगानं ८ जुलै रोजी नगर परिषदा आणि नगर पंचायतीच्या निवडणुका जाहीर केल्या होत्या. मात्र ओबीसी आरक्षणामुळे(OBC Reservation) सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. त्यामुळे १९ जुलै रोजी कोर्टात होणाऱ्या सुनावणीनंतरच पुढचा निर्णय घेण्यात येणार आहे.
[read_also content=”अमित ठाकरेंना मंत्रीपद मिळणार असल्याची बातमी चुकीची – राज ठाकरेंचा खुलासा https://www.navarashtra.com/maharashtra/mns-chief-raj-thackeray-clarification-about-cabinet-position-to-amit-thackeray-nrsr-304203.html”]
मिळालेल्या माहितीनुसार राज्यामध्ये पुणे (Pune), सातारा, सांगली(Sangli), सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, धुळे (Dhule), नंदुरबार, जळगाव (jalgaon), अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड (Beed), उस्मानाबाद, लातूर (Latur), अमरावती आणि बुलढाणा या १७ जिल्ह्यातील ९२ नगर परिषदा आणि चार नगरपंचायतीमध्ये निवडणुका होणार होत्या.