कोरेगाव : महाराष्ट्रातील ओबीसी समाजावर आलेले संकट दूर करण्यासाठी ओबीसीचे नेते छगन भुजबळ यांचे हात बळकट करा, असे आवाहन महाबळेश्वर तालुका ओबीसी संघटनेचे अध्यक्ष अनिल लोहार यांनी केले.
कोरेगाव तालुका ओबीसी संघटनेच्या कोरेगाव( जि.सातारा)येथील मेळाव्याच्या उद्घाटनपर भाषणात लोहार बोलत होते. ओबीसीवरती आलेले संकट दूर करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये छगन भुजबळ ओबीसींची एकजूट करत आहेत. सातारा जिल्हा ओबीसी संघटनेच्या वतीने त्यांचे हात बळकट करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात ओबीसींचे मेळावे घेऊन, ओबीसी समाजात जागृती केली जात आहे. तेव्हा ओबीसी समाजाने आता जागृत होऊन आपल्या वरच्या येणाऱ्या संकटाला थोपवण्याचे काम करावे,असे आवाहन लोहार यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सातारा जिल्हा ओबीसी संघटनेचे अध्यक्ष भरत लोकरे हे होते. यावेळी महिला जिल्हा अध्यक्षा सुनीता लोहार, जिल्हा महासचिव प्रमोद शिरसागर, सातारा तालुका ओबीसीचे अध्यक्ष वैभव गवळी, प्रकाश जाधव, माणिक हजारे, तेजस्वी पवार, मनीषा गायकवाड, सुमन पवार यांची भाषणे झाली. यावेळी जीवन काशीद, दत्तात्रय चव्हाण, दत्तात्रय क्षीरसागर, रामदास मोहिते, महेंद्र काशीद, रामचंद्र माने, राजेंद्र पिसाळ, अमोल करणे, सोपान जगताप, मारुती काशीद, दत्तात्रेय सपकाळ, किशोर कुंभार, सोमनाथ खेडकर ,अनिल काकडे, विठ्ठल पवार, विठ्ठल झेले पाटील, रामचंद्र राऊत, जीवन नांदे, भाऊसाहेब मोहोळ, दीपक बोडके, नामदेव सुतार, हनुमान शिंदे, रवींद्र वाघ, भगवान वाघ, मोहन माने, सरपंच गुलाबराव सुतार, दयानंद गायकवाड , सयाजी काकडे, भरत काकडे, संतोष खिलारे, भीमराव कानडे, नामदेव शिंदे, जितेंद्र वाघ आदी उपस्थित होती. कोरेगाव तालुक्यात दहा समन्वयकांची निवड करण्यात आली. त्यांना निवेदन पत्र देऊन त्यांचा सत्कार झाला. या कार्यक्रमास तालुक्यातील विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल भुजबळ यांनी केले. आभार उद्धव करणे यांनी मानले.