पुणे : एकाच कुटुंबातील तब्बल चार जणांनी विष पिऊन आत्महत्या (Sucide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळं संपूर्ण पुणे शहरात (Pune City) खळबळ उडाली असून मृतांमध्ये (Death) दोन मुलांचाही समावेश आहे. पुण्यातील मुंढवा परिसरात ही घटना घडली असून शेअर मार्केटमध्ये मोठं आर्थिक नुकसान झाल्यामुळे आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
शेजारी राहणाऱ्या लोकांच्या लक्षात हा सर्व प्रकार आला. त्यानंतर शेजाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर या प्रकरणाची माहिती मिळताच मुंढवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शेअर मार्केटमध्ये आर्थिक नुकसान झाल्यामुळे या कुटुंबाने आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे. हे दांपत्य 2 महिन्यापूर्वी केशवनगर भागात एका घरात भाड्याने राहत होते.
दरम्यान, संशय आल्यानंतर शेजाऱ्यांनी दरवाजा उघडून पाहिला. त्यांना घरातील बेडरूम मध्ये 4 जणांचे मृतदेह आढळून आले. शेजाऱ्यांनी तात्काळ या घटनेची माहिती नागरिकांना पोलिसांना दिली. सध्या पोलिस या प्रकरणाची सखोल माहिती घेत आहे. मात्र, या घटनेनंतर केशवनगर भागात तणावाचं वातावरण असल्याचं पहायला मिळतंय.






