दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणावरून नेत्याचे खासदार सुळेंना पत्र (Photo Credit- Social Media)
मुंबई: भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटण्याचे आरोप झाले, यावरून काल मुंबईतील विवांता हॉटेलमध्ये मोठा गोंधळही झाला. या प्रकारानंतर विरोधीपक्षनेत्यांनी भाजपवर टीकेची झोड उठवली. राज्यभरात एकच खळबळ माजली होती. या प्रकारानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर भाजपकडून गंभीर आरोप करण्यात आले. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी निवडणुकीच्या आदल्या दिवसी रात्री घेतलेल्या पत्रकार परिषदेत सुप्रिया सुळे आणि काँग्रेस नेते नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले. एका ऑडिओ क्लिपचा संदर्भ देत सुप्रिया सुळे बिटकॉईनचे व्यवहार करून निवडणुकांसाठी निधी जमा करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता.
सुधांशु त्रिवेदी यांनी केलेल्या आरोपांवर सुप्रिया सुळे यांनी सविस्तर स्पष्टीकरण दिलं आहे. माजी पोलीस अधिकारी रवींद्र पाटील यांनी सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंवर आरोप केल्यानंतर त्या पाठोपाठ सुधांशू त्रिवेदींनी सुप्रिया सुळेंवर गंभीर आरोपही केले. सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंनी विदेशी चलनाचा वापर करून निवडणुकीवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला. असा आरो करत चौकशीची मागणी केली.
त्रिवेदी यांच्या आरोपांना उत्तर देताना सुप्रिया सुळें म्हणाल्या “ माझ्यावर असे आरोप करण्यात आल्याचे काल संध्याकाळी मला कळाले, माझ्या हातात ते व्हॉईस रेकॉर्डिंग आल्यानंतर मी सर्वात आधी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना फोन केला. काही बनावट रेकॉर्डिंग फिरत आहे आणि मला सायबर क्राईमकडे तक्रार करायची असल्याचं मी त्यांना सांगितलं. मी काल संध्याकाळीच ऑनलाईन तक्रार दाखल केली. या सगळ्या रेकॉर्डिंग्स आणि मेसेजेस खोटे आणि बनावट आहेत.
आमचा कोणालाही पाठिंबा नाही..व्हायरल पत्र खोटं, मतदार सुज्ञ; राज ठाकरेंचा पलटवार
त्याचवेळी आपण सुधांशु त्रिवेंदींविरोधात मानहानीचा दावा केल्याचेही सुप्रिया सुळे यांनी यावेळी सांगितले. “आज सकाळी मी सुधांशु त्रिवेदींना मानहानीची नोटीस पाठवली. त्यांनी मला पाच प्रश्न विचारले आहे, मी बाहेर येऊन उत्तर द्यावं असं आवाहनही त्यांनी केलं आहे. मी त्यांच्या प्रश्नांना उत्तरंही देणार आहे. त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला माझं उत्तर असेल, “नाही.” सगळे आरोप खोटे आहेत. त्यामुळेच मी सायबर क्राईमकडे तक्रार केली असून त्याच्याविरोधात अवमान याचिकाही दाखल केली आहे.
सुप्रिया सुळेंच्या व्हायरल व्हिडीओबाबत बोलताना अजित पवारांनीही ऑडिओतील आवाज सुप्रिया सुळेंचा असल्याचे म्हटले होते. त्यावरही बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “ते अजित पवार आहेत. ते काहीही म्हणू शकतात. राम कृष्ण हरी. पण व्हायरल ऑडिओमध्ये माझा आवाज नाही. तो आवाज कुणीही चेक करावा. पोलीस अधिकारी रवींद्र पाटील हे दोन वर्षे तुरूंगात राहूल आले आहेत. त्यांनी माझ्यावर आरोप केले. पण ती ऑडिओ क्लिप खोटी आहे. असंही त्यांनी स्पष्ट केलं.