मुंबई : सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण एक वेगळ्या कारणामुळं तापलं आहे. मागील काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्यामुळं भाजप (BJP) व शिंदे गटातील (Shinde Group) नेत्यांवर टिका होत आहे. महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवरायांवरील (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्याचं प्रकरण ताजं असतानाच, आता मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) यांनी बुधवारी प्रतापगडावर शिवप्रताप दिनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबतच्या वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यामुळं विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरत शिंदे-फडणवीस सरकारवर टिका केली आहे. तसेच लोढांच्या वक्तव्यामुळं पुन्हा एकदा वादाचा तोंड फुटले आहे.
[read_also content=”राणा दाम्पत्याच्या अडचणीत वाढ, सत्र न्यायालयाने बजावले जामीनपात्र वॉरंट https://www.navarashtra.com/maharashtra/rana-family-problems-increase-sessions-court-issues-bailable-warrant-349992.html”]
दरम्यान, मंगलप्रभात लोढांच्या वक्तव्याचा विरोधकांनी समाचार घेतला असून, लोढांनी माफी मागवी असं विरोधकांनी म्हटलं आहे. तसेच एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीची तुलना शिवरायांच्या पराक्रमाशी कशी काय होऊ शकते? असं विरोधकांनी म्हटले आहे. तसेच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मंगलप्रभात लोढा यांचा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा, अशी मागणी पटोलेंनी केली आहे. तर या गद्दार आमदारांची तुलना महाराजांच्या आग्र्यातील सुटकेशी कशी होईल? यांनी गद्दारी केली. तर महाराजांनी हिंदुत्त्वासाठी स्वराज्यासाठी पराक्रम गाजवला असं ठाकरे गटाचेप्रमुख उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. त्यानंतर आता काँग्रेसने थेट लोढांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
काय म्हणाले मंगलप्रभात लोढा?
बुधवारी प्रतापगडावर शिवप्रतापदिन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते. यावेळी बोलताना लोढा म्हणाले की, औरंगजेबाने छत्रपती शिवरायांना डांबून ठेवलं होतं, पण स्वराज्यासाठी, हिंदुत्वासाठी ते गनिमी काव्याने बाहेर पडले. याचप्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनादेखील कुणीतरी डांबून ठेवलं होतं, पण महाराष्ट्रासाठी ते बाहेर पडले, असं म्हणत मंगलप्रभात लोढांनी थेट शिवरायांच्या ऐतिहासिक आग्रा सुटकेची तुलना एकनाथ शिंदेंच्या बंडाशी केली. त्यांनंतर लोढांच्या या विधानाचा निषेध केला जात आहे, तसेच विरोधक आक्रमक झाले असून, लोढांनी माफी मागावी अशी मागणी होत असून, काँग्रेसने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.