बावडा : माळशिरस तालुक्यात माळशिरस- अकलूज रोड वर वटपळी नजीक बावडा येथील श्री शिवाजी विद्यालयाच्या शैक्षणिक सहलीच्या एस. टी.बसची टेम्पोस पाठीमागून धडक होऊन झालेल्या अपघातात एका शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला झाला. तर एक शिक्षक जखमी झाला आहे. बाळकृष्ण हरिभाऊ काळे (रा. रेडणी ता. इंदापूर) असे मृत्यूमुखी पडलेल्या शिक्षकाचे नाव आहे. सदरचा अपघात आज गुरुवारी पहाटे 6 वा.च्या सुमारास घडला.
या अपघातामध्ये सुदैवाने बसमधील विद्यार्थ्यांना इजा झाली नाही. सदरची शैक्षणिक सहल मंगळवार दि. १९ च्या रात्री कोकणात गेली होती. तेथून परतत असताना बस क्र. एम.एच. १४ बी. टी. ४७०१ ला हा अपघात घडला. या बसमधील विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात आले आहे.