संग्रहित फोटो
ठाणे : ठाण्यात ठाकरे गट आणि शिंदे गट (Shinde Group) या दोन गटात राडा झाला होता. शिंदे गटाने ठाकरे गटातील पदाधिकारी रोशनी शिंदे (Roshani Shinde) यांना मारहाण केल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. त्यानंतर आता याविरोधात महाविकास आघाडीकडून जनप्रक्षोभ मोर्चा काढण्यात आला.
रोशनी शिंदे मारहाण केल्याच्या विरोधात महाविकास आघाडीचा जनप्रक्षोभ मोर्चा आयोजित करण्यात आला. यामध्ये आदित्य ठाकरे बोलत होते. ते म्हणाले, ‘संस्कृत ठाणे एका दिवसांत बदनाम केले. हे सरकार काही तासांचेच आहे फक्त. ठाण्याचे माजी महापौर या मारहाण प्रकरणाचे समर्थन करतात. आज मोर्चासाठी अटी घातल्या. आता लोकशाही संपली. तुम्ही माफ करण्याच्या लायकीचे नाहीत. महिलेवर हल्ला होतो आणि तिच्यावरच गुन्हा दाखल होतो’.
तसेच ते पुढे म्हणाले, शेतात फिरून मर्दानगी दाखवाची. भाजपमध्ये प्रवेश केला की सेफ वाटत असते. भाजपच्या प्रचारासाठी मोक्का लागलेले लोक मैदानात आहेत. मोर्चासाठी अटी लावतात, आता लोकशाही संपली. राज्यात कोविडची परिस्थिती नियंत्रणात राहिली.
चोरांचा पक्ष नसतो तर टोळी असते
शिंदे गटावर टीका करताना ते म्हणाले, ‘तुम्ही माफ करण्याच्या लायकीचे नाहीत. महिलेवर हल्ला होतो आणि तिच्यावरच गुन्हा दाखल होतो. भाजपमध्ये प्रवेश केला की सेफ वाटत असते. आम्ही लवकरच येणार आणि गद्दारांना त्यांची जागा दाखवणार’ असेही ठाकरे यांनी म्हटले आहे.