ठाणे : राज्यात महिलांवर बलात्कार होत आहेत. कायदा सुव्यवस्था बिघडत आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली तर, ते निर्लज्ज उत्तर देऊन उत्तर प्रदेशाचे दाखल देतात. महाराज असते तर, सरकारचा कडेलोट केला असता, असे विधान भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी ठाण्यातील कार्यक्रमात बोलताना केला. आमच्या पक्षाला फ्लावर समजू नका आणि आम्ही फायर आहोत, असेही त्या म्हणाल्या.
वर्तकनगर येथील भीमनगर भागात भाजप पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पडला. त्यामध्ये त्या बोलत होत्या. किसननगर आणि वर्तकनगरमधील पक्ष प्रवेश म्हणजे ठाण्यातील मिशन कमळला मिळालेला शुभ संकेत आहे. तसेच ठाण्यात भाजप फुटणार आशा वावड्या उठविणाऱ्यांना किसनगरचा पक्ष प्रवेश ही एक चपराक आहे, असे चित्रा वाघ यांनी सांगितले.
[read_also content=”एसटी कर्मचाराची संप: राज्य सरकारकडून विलिनीकरणाचा अहवाल हायकोर्टाला सुपूर्द, आज हायकोर्टात महत्त्वाची सुनावणी https://www.navarashtra.com/mumbai/kokan/mumbai/st-workers-strike-state-govt-submits-merger-report-to-hc-important-hearing-in-hc-today-243106.html”]
ठाण्यात सत्ताधारी शिवसेनेला पाणी आणि गटार समस्याही सोडविता आलेल्या नाहीत. दोन मंत्री असूनही परिवहन सेवा सक्षम नाही. एकहाती सत्ता येणार असे म्हणणाऱ्यांना खिंडार पडल्याशी राहणार नाही आणि त्यांचे एकहाती सत्तेचे दिवास्वप्न राहील, असेही ते म्हणाल्या. ठाण्यात महिला अधिकाऱ्याची बोटे छाटली, डोंबिवली बलात्कार प्रकरण यामुळे कायद्याचे धिंडवडे निघाले आहेत. याबाबत जे बोलतात, त्यांच्यावर गुन्हे दाखल होत आहे. किती गुन्हे दाखल झाले तरी आम्ही गप्प बसणार नाही, असेही त्यांनी सांगितले. क्लस्टर योजनेचे बॅनर लावून ठाणेकरांना फसवण्याचे काम सुरू असून त्याचा जाब विचार असेही त्यांनी सांगितले.
[read_also content=”समीर वानखेडेंना ठाणे पोलिसांकडून समन्स https://www.navarashtra.com/thane/kokan/thane/thane-police-summons-to-sameer-wankhede-nrps-243094.html”]