ठाणे : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे (Corona Third Wave) पुढे ढकलण्यात आलेली सिडकोच्या ५७३० घरांची सोडत (Cidco House Lottery) आज २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) निमित्तानं जाहीर करण्यात आली आहे. लॉटरी काढण्यासाठी प्रजासत्ताक दिनाची निवड करण्यात आली आहे. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) या कार्यक्रमासाठी खास उपस्थित होते.
लॉटरीची घोषणा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. पंतप्रधान आवास योजनांच्या लाभार्थींना याचा फायदा होणार आहे. सिडकोनं तळोजा नोड साठी लॉटरी काढली आहे. ७३ व्या प्रजासत्ताक निमित्ताने या गृहनिर्माण योजनेला सुरुवात होणार असून ऑनलाईन अर्ज करून नोंदणी करता येणार आहे. २४ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करून नोंदणी करता येणार आहे, एकूण घरांपैकी प्रधानमंत्री आवास योजनेसाठी १५२४ घर उपलब्ध असून उर्वरित ४२०६ सर्वसाधारण प्रवर्गासाठी उपलब्ध होणार आहेत.
सिडकोसोबत आपली एक नवीन सुरुवात!
सिडकोतर्फे तळोजा येथे ५७३० सदनिका उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटातील नागरिक या योजनेत सहभागी होऊ शकतात.
अधिक माहितीसाठी https://t.co/6vZnqYm13r#YourCIDCOHome pic.twitter.com/ngsbs478D7
— CIDCO Ltd (@CIDCO_Ltd) January 26, 2022
७३ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सिडकोच्या वतीने ५७३० घरांच्या सोडतीला सुरुवात करण्यात आली आहे. सर्वसामान्य माणसाचे स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही विशेष सोडत जाहीर करण्यात आली आहे. आजपासून फॉर्म भरण्याची ऑनलाइन प्रक्रिया सुरू झाली असून पुढील महिनाभर ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या सोडतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी नागरिकांना केलं आहे.
राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सिडकोच्या ५७०३ घरं तळोजा येथे गृहनिर्माण योजना सुरु करण्यात आली असल्याची माहिती दिली. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी १५२४ घरे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत देण्यात येणार आहेत.या मधील लाभार्थ्यांना अडीच लाखाच्या अनुदानाचा लाभ होणार आहे. उर्वरित घर सर्वसाधारण प्रवर्गासाठी असतील. सर्व नागरिकांच्या परवडणाऱ्या घरांसाठी शासन कटिबद्ध आहे. सिडकोच्या लॉटरीसाठी नोंदणीला आजपासून सुरुवात होत असून २४ फेब्रुवारीपर्यंत ही नोंदणी सुरु राहणार असल्याचंही मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.