फोटो सौजन्य: गुगल
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते केडीएमसीतील विविध विकास कामांचे भूमीपूजन होणार आहे. त्याआधीच मनसे नेते राजू पाटील यांनी ट्वीटच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांच्यावर टिका केली आहे. चला चला भूमीपूजनांची वेळ आली. पालिकेची निवडणूक आली. भूमीपूजन केलेल्या पलावा पूल, लाेकग्रामपूल, दीवा आरआरओबी, अमृत पाणी पुरवठा योजना यांचे लोकार्पण कधी होईल. आमची एक महिला भगिनी पालिका दवाखान्याबाहेर रुग्णवाहिका नसल्याने मृत्यूमुखी पडली. सुतिकागृहाचे काम अजून का सुरु झाले नाही ? याचा सवाल उपस्थित केला आहे.
महापालिकेच्या माध्यमातून शहरात कचरा संकलन वाहतूक, रस्ते सफाई आणि शहर स्वच्छतेच्या कामाचा शुभारंभ करण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या अभियानाचा आज १८ मे रोजी डोंबिवली पूर्वेतील सावळाराम महाराज क्रीडा संकुलाच्या मैदानात सायंकाळी ४.३० वाजता या प्रकल्पाचे भूमिपूजन संपन्न होणार आहे. त्याचबरोबर कल्याण शहरातील दावडी येथे टाटा टेक्नॉलॉजी लिमीटेड संचलीत कौशल्यवर्धन केंद्र, सेंटर फॉर इन्व्हेंशन इनोव्होवेशन, इक्युबेशन अँड ट्रेनिंग सेंटरची उभारणी करण्यात येत आहे. त्याचेही भूमीपूजन उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.
याच पार्श्वभूमीवर मनसे नेते राजू पाटील यांनी ट्वीट केेले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते केडीएमसीत काही भूमीपूजने होत आहे. या बद्दल कल्याण डोंबिवलीकर जनतेला शुभेच्छा व पालकमंत्र्यांचे आभार . या निमित्ताने अनायसे माननीय पालकमंत्री आज कल्याण डाेंबिवलीत येत आहे. तर त्यांनी २०१८ मध्ये भूमीपूजन केलेल्या पलावाल पूल, लोकग्राम पूल, दीवा आरोबी, २७ गावातील अमृत योजनेचा आढावा घेऊन त्याच्या लोकार्पणाची तारीख जाहिर करावी.
चला चला भूमीपुजनांची वेळ झाली, पालिकेची निवडणूक आली !
आज पालकमंत्री श्री.एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते केडीएमसीत काही भूमीपुजन होत आहेत त्याबद्दल कल्याण-डोंबिवलीकर जनतेला शुभेच्छा व पालकमंत्र्यांचे आभार !
या निमित्ताने अनायसे मा.पालकमंत्री आज कल्याण-डोंबिवलीत येत आहेत तर…
— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) May 18, 2025
एकीकडे परिवहनच्या ताफ्यात २०० इलेक्ट्रिक बस केवळ चार्जिंग स्टेशन नसल्याने येत नाहीत. आमची एक महिला भगिनी पालिका दवाखान्याबाहेर रुग्णवाहिका नसल्याने मृत्यूमुूखी पडील. तसेच डोंबिवलीतील सुतिका गृहाचे काम अजून का सुुर होत नाही. याचा आढावा घेऊन त्यावर खुलासा करावा. बाकी कल्याण शीळ रस्त्याचा बट्टयाबोळ मग त्यात रस्ते बाधीतांच्या मोबदल्या अभावी रखडलेली तिसऱ्या व्या लाईनचे भूसंपादन असेल. मेट्रोचे बेशिस्त काम असेल. या रस्त्यावरी अतिक्रमणे असतील. हा सर्व त्यांच्याच खात्याचा प्रताप आहे. त्यावरही सकारात्मक निर्णय घेतील अशी अशी आशा करु या, अशा शब्दात राजू पाटील यांनी एकनाथ शिंदेवर जहरी टीका केली आहे.