नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पोलिसयंत्रणा ॲक्शन मोडमध्ये,रस्त्यावर फिरून नशाखोरांवर कडक कारवाई
कल्याणमध्ये चिमुरडीवर झालेल्या लैगिंक अत्याचार आणि हत्येचा घटनेनंतर संपूर्ण कल्याण शहर हादरुन गेलं आहे. याच पार्श्वभूमीवर आता पोलिसांनी आता सुरक्षा वाढवली आहे. लैगिंक अत्याचार आणि हत्येचा घटनेनंतर कल्याणचे डीपीसी अतुल झेंडे हे ॲक्शन मोडमध्ये आहेत. डीसीपी रात्रीच्या वेळेस स्वत: रस्त्यावर फिरत आहेत. रस्त्यावर नशा करुन फिरणाऱ्या तरुणांना स्वत: शिक्षा देत आहेत. बुधवारी आणि गुरुवारी रात्री रस्त्यावर फिरणाऱ्या तरुणांना पकडून डीसीपी यांनी चोप दिला. तसेच खडेगोळवली परिसरातील नशाखोर तरुणांना उठाबशा काढायला लावल्या.
सध्या नववर्षाच्या स्वागताची तयारी ठिकठकाणी सुरु आहे दरम्यान पोलिसांनी कल्याण डोंबिवली महानगरपाालिका परिसरात रोडरोमियो आणि नशाखोरांवर कडक करारवाई करण्यास सुरुवात केली आहे. कल्याण डोंबिवली या दोन्ही शहरात रात्रीच्या वेळेस निर्जनस्थळी रस्त्याच्या बाजूला टवाळखोर तरुण नशा करताना दिसतात. हे तरुण रस्त्यावर जाणाऱ्या मुलींना महिलाना आणि नागरीकांना त्रास देतात. तीन दिवसापूर्वी कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरातील एका अल्पवयीन मुलीवर लैगिक अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी याच्या घराच्या बाजूला असलेल्या एका ठीकाणी काही तरुण नशा करताना पाहिले. स्थानिक नागरीकांनी कोळसेवाडी पोलिसांना तक्रार केली हेाती.
या घटनेनंतर एकही नशाखोर नशा करताना रस्त्यावर फिरताना दिसू नये अशी सूचना कल्याणचे डीसीपी अतुल झेंडे यानी आठ ही पोलिस स्टेशनला दिली आहे. त्या अनुषगांने बाजारपेठ, खडकपाडा, मानपाडा, रामनगर, विष्णूनगर, महात्मा फुले पोलिस ठाणे या पोलिस स्टेशनला कारवाईची सूचना दिली आहे. रस्त्यावर जिथे कुठे नशोखाेर दिसत आहे. त्यांना त्याच ठीकाणी पकडून स्वत: डीपीसी शिक्षा देत आहे. बुधवारी रात्री नशाखोराना डीपीसीनी फटकावले. त्यानंतर गुरुवारी खढेगोळवली परिसरातील नशाखोरांना पकडून उठाबशा काढण्यास सांगितले. डीसीपीच्या या कारवाईचे नागरीकांनी स्वागत केले आहे. ही कारवाई सातत्याने झाली पाहिजे अशी आपेक्षा नागरीकांनी व्यक्त केली आहे.
कल्याण पूर्वेत चिमुरडीवर झालेल्या लैगिंक अत्याचार आणि हत्येमुळे राज्यात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान शिवसेनेचे शहरप्रमुख निलेश शिंदे आणि परिसरातील आजी माजी नगरसेवकांनी डीसीपी अतुल झेंडे यांची भेट घेत काही दिवसांपूर्वी निवेदन दिलं आहे. कल्याण पूर्वेत एका चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना कल्याण पूर्व परिसरात घडलेली आहे. माणूसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेचा राज्यभरातून तीव्र निषेध केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी डीसीपी अतुल झेंडे यांची भेट घेतली आहे. या सगळ्या प्रकरणाची सखोल चौैकशी व्हावी. गेल्या वर्षभरातच कल्याण पूर्वेमध्ये ही दुसऱ्यांदा घडलेली घटना असल्याचं म्हटलं जात आहे. याचपार्श्वभूमीवर शिवसेना शहर प्रमुख निलेश शिंदे यांनी सदर घटनेचा निषेध नोंदवत पोलिस आयुक्तांची बैठक घेतली आहे. या भेटीत त्यांनी डीसीपी यांनी निवेदन देत तपासाला गती मिळावी असं सांगितलं आहे.