मुंब्रा–डायघरमध्ये आगीचा मोठा भडका; टायर गोदाम ज्वाळांच्या विळख्यात
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी शॉर्टसर्किट किंवा अन्य तांत्रिक बिघाडाची शक्यता वर्तवली जात आहे. स्थानिक प्रशासन आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले असून परिसरातील नागरिकांना सुरक्षित अंतरावर ठेवण्यात येत आहे. गोदामात साठवलेल्या टायरमुळे आग अधिक वेगाने पसरल्याचे सांगितले जात आहे. सध्या जीवितहानीबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नसून अग्निशमन दलाकडून बचाव आणि नियंत्रणाचे काम सुरू आहे.
दरम्यान, परिसरात वाहतूक व्यवस्थेवरही परिणाम झाला असून नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळाल्यानंतर पंचनामा आणि पुढील चौकशी केली जाणार आहे.
बातमी अपडेट होत आहे..






