डोंबिवलीत रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण काम रखडले
डोंबिवली: डोंबिवली पश्चिमेतील गरिबाचा वाडा येथील श्रीधर म्हात्रे चौक ते अनमोल नगरी पर्यंतचा रस्त्याचे सिमेंट काँक्रीटंट करण्याचे काम २०२४ मध्ये वर्षी मंजूर झाले आहे. गेल्या वर्षी मे जूनमध्ये या रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात करण्यात आली .मात्र त्या वेळी अरुंद रस्त्यामुळे तेथे दोन अपघात घडले. त्यामध्ये एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला तर एका रहिवाशी जखमी झाले. गरीबाचा वाडा उत्कर्ष समितीने याबाबत आवाज उठल्यानंतर या रस्त्याचे काम थांबविण्यात आले होते. मात्र प्रशासनाची टोलवाटोलवी आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष यामुळे गेल्या वर्षभरात त्या रस्त्याचे काम पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे गरिबाचा वाडा उत्कर्ष समितीने आंदोलनाचा इशारा दिला आहे.
गरीबाचा वाडा श्रीधर म्हात्रे चौक ते अनमोल नगरी पर्यंतचा रस्ता खूप अरुंद आहे.या रस्त्यावर एकाच वेळी समोरा समोर दोन मोठी वाहने आली तर वाहतुकीची कोंडी होत असते . गरिबाचा वाडा परिसरात अनेक मोठमोठे गृहनिर्माण कॉम्प्लेक्स उभे राहिले असल्याने लोकवस्ती गेल्या २० ते २५ वर्षात मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.लोकवस्ती सोबत वाहनांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे . त्यामुळे या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात यावे,याबाबत पुण्यनगरी अनेकदा आवाज उठवला.त्यानुसार पावसाळ्यानंतर या रस्त्याचे रुंदीकरण करून सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात यावे, अशी मागणी गरिबाचा वाडा उत्कर्ष समितीने महापालिकेकडे केली होती, ती मागणी तत्कालीन महापालिका आयुक्त इंदू राणी जाखड मान्य केली .
वास्तविक या रखडलेल्या रस्त्याचे काम पावसाळ्यानंतर त्वरित सुरू होणे गरजेचे होते. मात्र ते उशिराने सुरू झाले. आत्ता मे महिना अर्धा संपला असून दरम्यानच्या काळात केवळ रस्ता रुंदीकरण व दोन्ही बाजूचे गटार बांधकाम इतकेच काम झाले आहे. रस्त्यामध्ये अडथळा ठरणारे झाडे, विद्युत पोल विद्युत दिवे ट्रान्सफॉर्मर अद्याप हलविण्यात आलेले नाहीत. पावसाला तोंडावर आला असून सदर रस्त्याचे काम कधी होणार ?हाच खरा प्रश्न गरिबाचा वाडा येथील सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे .
हाच रस्ता पुढे रिंग रोडला जाऊन मिळणार आहे,त्यामुळे हा रस्ता महत्वाचा आहे.या अरुंद रस्त्यावरून पाण्याचे टँकर, केडीएमसीची आरसी कचरा गाडी, मल्टी एक्सल डंपर ,शालेय बसेस ,रेडी मिक्स सिमेंटची वाहतूक करणाऱ्या गाड्या अशी अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असते .पावसाळ्या पूर्वी रस्त्याचे काम झाले नाही तर आधीच अरुंद असलेल्या या रस्त्यावर पुन्हा तेथे अपघात घडण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी एका महिलेचा डंपर खाली चिरडून मृत्यू झाला होता तर एका ज्येष्ठ नागरिकाचा हात फक्चर झाला होता.
गरिबाचा वाडा उत्कर्ष समितीने मंगळवारी केडीएमसी एच वार्ड चे सहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांची भेट घेतली व त्यांना वस्तुस्थिती सांगितली. त्यावेळी त्यांनी सदरचे काम महापालिकेकडे नसून एम एम आर डी कडे असल्याचे सांगितले. त्यानुसार महापालिकेचे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मनोज सांगळे यांच्याशी संपर्क केला. त्यांनाही वस्तुस्थिती कथन केली. त्यानुसार सदर रखडलेल्या रस्त्याची पाहणी करण्यात आली.या रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण पावसाळ्यापूर्वी पूर्ण होईल याकडे लक्ष देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
तसेच १५ जून पूर्वी सिमेंट काँक्रीटीकरण पूर्ण होत नसेल तर सध्या अस्तित्वात असलेल्या रस्त्याचे डांबरीकरण करून द्यावे, अशी मागणी यावेळी गरिबाचा वाडा उत्कर्ष समितीने केली आहे. येत्या चार दिवसात रस्त्याचे काम प्रत्यक्षात सुरू झाले नाही तर येत्या रविवारी डोंबिवली येथील गरीबाचा वाडा श्रीधर म्हात्रे चौक येथे गरिबाचा वाडा उत्कर्ष समितीच्या वतीने केडीएमसी आणि एम एम आर डी ए च्या अनागोंदी आणि कासव छाप कारभाराच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात येणार असल्याचा इशारा गरिबाचा वाडा उत्कर्ष समितीचे अध्यक्ष विवेकानंद धवसे यांनी दिला आहे.