मुंबई : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जोमाने कामाला लागले आहेत. मागील आठवड्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर दोन दिवसीय विशेष अधिवेशन (Special Adhiveshan) बोलावण्यात आलं होतं. विधानसभा अध्यक्षांच्या (Speaker of the Assembly) निवडीनंतर सोमवारी शिंदे-फडणवीस (Shinde-fadnvis government) सरकारने विश्वासदर्शक ठराव बहुमताने जिंकला. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्री पदाचा पदभार स्विकारला. त्यानंतर एकनाथ शिंदे जोमाने कामाला लागले आहेत.
[read_also content=”लक्ष आता मिनी मंत्रालयाकडे; काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबरच भाजपचाही लागणार कस… https://www.navarashtra.com/maharashtra/now-target-on-zp-and-panchayat-samiti-election-in-ahmednagar-nrka-301543.html”]
सध्या पंढरपूरची वारी सुरु आहे. रविवारी आषादी एकादशी आहे. त्यानिमित्त गावागावातून वारकरी पायी वारी करत आहेत. सांगली येथील रस्ते अपघातात जखमी झालेल्या सर्व वारकऱ्यांवर तातडीने उपचार करून गरज पडल्यास त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरुन अधिकाऱ्यांना दिले आहेत. मिरज पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील केरेवाडी येथे आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत पीकअप जीप घुसून झालेल्या या अपघातात 14 वारकरी जखमी झाले.
शेवटी ते आपले वारकरी आहेत, जो खर्च येईल तो मी करतो. पण चांगल्या रुग्णालयात तातडीने त्यांच्यावर उपचार व्हावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फोनवरुन दिलेत. जखमींवर उपचारासाठी दाखल करण्यात आले. यानंतर या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तात्काळ विचारपूस अधिकाऱ्यांना चांगल्या उपचारासाठी करत फोनवरुन निर्देश दिलेत.