नाशिक : नाशिकमधून (Nashik) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नाशिकमध्ये बापानेच पोटच्या मुलीची (Girl) हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ओढणीने गळा आवळून हत्या केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ज्योती किसन भारती वय 24 असे हत्या झालेल्या मुलीचे नाव आहे. अंबड परिसरातील एक्सलो पॉईंट येथील धक्कादायक प्रकार घडला आहे. वारंवार घरातील किरकोळ वादातून घर सोडून निघून जात असल्याने बापाने पोटच्या मुलीची हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. संशयित आरोपी किसन भारती याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अधिक तपास अंबड पोलिस करत आ्हेत. अशी माहिती पोलीस उप आयक्त चंद्रकांत खांडवे यांनी दिली.