पुणे : शिवसेना आणि कार्यकर्ते यांचे नाते कृष्ण आणि सुदाम्याचे आहे. आजच्या अशा कार्यक्रमातुन असल्याने महिलांना स्वतःचा वेळ मिळतो. त्यांना रोजच्या आयुष्यात स्वतःचा वेळ असा मिळत नसतो. आजचा कार्यक्रम म्हणजे हे काही वेळ माहेरपण सुरू आहेे, असा विचार करा. कारण हा एक कुटुंब मेळावा आहे असे वातावरण तयार झाले आहे. कौटुंबिक प्रसंगात एकत्र येऊन महिलांनी एकमेकींना आधार दिला पाहिजे. आमच्या सर्वच महिला आता स्मार्ट आणि सुंदर आहेत. परंतु त्यासोबत अनेक ठिकाणीं महिलांसाठी आरोग्य शिबिरेही आवश्यक आहेत. प्रत्येकीने आपला आणि समाजाचा विकास करण्यासाठी पुढे यावे. सामान्य महिलांनी दिलेला पाठिंबा हा मी राजकारणात काम करीत असताना कायम स्मरणात राहतो, असे कौतुकाचे उदगार आज विधान परिषद उपसभापती ना डॉ नीलम गोऱ्हे यांनी काढले.
पुणे शहर महिला आघाडीच्या वतीने आज लक्ष्मीनगर येथे आयोजित महिला संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी त्या बोलत होत्या. त्यांनी सर्वांना अक्षय तृतीयेनिमित्त सर्वांना मनापासून शुभेच्छा दिल्या.
त्या म्हणाल्या, महिलामध्ये सर्व रूपे असतात. सर्वांनी मनापासून एकत्र आले पाहिजे. शिवसेना महिला आघाडी शिस्तप्रिय आहे. अनेक सामाजिक उपक्रमात त्या सहभागी होतं असतात. याचे श्रेय आणि प्रेरणा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पासून आहे. त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख म्हणुन अनेक वेळा महिलांच्या प्रश्नांवर काम केले आहे. त्यामुळे अनेक मोठ्या मोठ्या प्रकरणांचा पर्दाफाश झाला आहे. मुख्यमंत्र्यांचे नाव अधिक उज्ज्वल करायचे आहे यासाठी काम करा.
कोविड काळात अनेक समस्या आल्या त्यावर मात करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. रोजगार निर्मिती आवश्यक आहे. महानगर पालिका स्तरावर असलेल्या अनेक समस्या सोडवण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील आहे. वस्ती पातळीवर काम करणाऱ्या घरकामगार नोंदणी झाली पाहिजे. त्यांना शासनाकडून अनुदान मिळते. त्यासाठी महिलांनी एकत्र येऊन प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. त्यातून महिलांचा आत्मविश्वास वाढला. अनेक ठिकाणी महिलांनी यशस्वीपणे व्यवसाय सुरू केला आहे.
यावेळी महाराष्ट्र शुल्क नियमन समिती सदस्य आणि पुणे मनपा शिक्षण मंडळ सदस्य शिरिष फडतरे, गजानन थरकुडे, दीपाली ओसवाल, खादी ग्रामोद्योग मंडळ चे उपसंचालक सदाशिव सुरवसे यांची भाषणे झाली.
[read_also content=”विद्यापीठातील विद्यार्थिनी वसतिगृहात परीक्षेच्या काळात पाण्याचे संकट, अभाविपचा आंदोलनाचा इशारा https://www.navarashtra.com/maharashtra/water-crisis-during-exams-in-university-student-dormitory-warning-of-abhavip-agitation-nrdm-275486.html”]
या मेळाव्यास शिवसेनेच्या महिला आघाडीच्या राधिकाताई हरीचश्चंद्रे , संगीता ठोसर, श्रुती नाझिरकर, दीपाली ओसवाल, राजश्री लोखंडे, वैशाली दारवटकर, अनघा ठुसे, शीतल ठोसर, गजानन थरकुडे, अशोक हरणावळ आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक सीमा मगर यांनी केले तर सूत्र संचालन वैशाली नेटके यांनी केले.