पुणे : भरधाव ट्रकला दुचाकी आडवी लावून तो ट्रक थांबवत दुचाकीस्वार चोरट्यांनी चालकाला लोखंडी रॉडच्या धाकाने लुटल्याची घटना घडली. पोलिसांनी एकाला अटक केली असून, दोघेजन पसार झाले आहेत. मंतरवाडी रस्त्यावरील सीएनजी पेट्रोल पंपाजवळ ही घटना मध्यरात्री घडली.
नितीन सुनिल चव्हाण (वय २२, रा. वैदुवाडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर, त्याचे दोन साथीदार पसार झाले आहेत. याप्रकरणी राम मोहाळे (वय २७) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा प्रकार शनिवारी रात्री एकच्या सुमारास घडली. तक्रारदार मंतरवाडी रोडने त्यांचा ट्रक घेऊन सोलापूर महामार्गाकडे निघाले होते. ते माल घेऊन जात असताना पाठिमागून दुचाकीवर आलेल्या तिघांनी त्यांच्या ट्रकला दुचाकी आडवी लावली आणि त्यांचा ट्रक थांबविला.
-लोखंडी रॉडचा धाक दाखवून रोकड घेतली
त्यानंतर दोघेजन कॅबिनमध्ये शिरले व त्यांनी लोखंडी रॉडचा धाक दाखवून त्यांना पैसे मागितले. त्यांचा मोबाईल काढून घेतला. तर, त्यांच्याकडील ५ हजारांची रोकड घेऊन पोबारा केला. अधिक तपास हडपसर पोलीस करत आहेत.