File Photo : Prakash Aambedkar
मुंबई : ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांची दिल्लीमध्ये मंगळवारी बैठक पार पडली. या बैठकीमध्ये इंडिया आघाडीतील अन्य पक्षांच्या समावेशाविषयी चर्चा करण्यात आली. यावेळी महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी या पक्षाला महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीमध्ये समाविष्ट करण्याबाबत चर्चा करण्यात आली, अशी माहिती इंडिया आघाडीच्या नेत्यांनी दिली आहे.
या संदर्भात बोलताना वंचितचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे म्हणाले की, संजय राऊत यांनी दिल्ली येथील पत्रकार परिषदेमध्ये वंचित बहुजन आघाडीचा समावेश इंडिया आघाडीत झाल्याचे जाहीर केले. मात्र ही धूळफेक आहे. अजूनही आम्हाला कुठलेही निमंत्रण पाठवण्यात आलेला नाही, किंवा आमच्याशी कुठलीही चर्चा करण्यात आलेली नाही. जोपर्यंत आम्हाला अधिकृत निमंत्रण पाठवले जात नाही किंवा जागा वाटपासंदर्भात आमच्याशी चर्चा केली जात नाही.
भाजपाला पराभूत करणे हेच ध्येय
जोपर्यंत आम्हाला अधिकृत निमंत्रण पाठवले जात नाही आणि आमच्याशी जागा वाटपाची चर्चा होत नाही, तोपर्यंत आमचा विश्वास नाही. भाजपाला पराभूत करण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येण्याचीच आमची भूमिका आहे. त्यासाठी इंडिया आघाडीत समाविष्ट होण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करत राहू, वंचित बहुजन आघाडीला गेल्या निवडणुकीत स्वतंत्र बऱ्यापैकी मते मिळाली. मात्र त्यांना जागा मिळू शकल्या नाहीत.