There Is Water In Arabwadi Lake And Drought Situation In The Village Nrdm
धरण उशाला कोरड घशाला; अरबवाडी तलावात पाणी असून गावात दुष्काळजन्य परिस्थिती
कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील पाणीदार गाव म्हणून परिचित असलेले अरबवाडी गाव सध्या ग्रामपंचायतीच्या नियोजन शून्य कारभारामुळे गेली आठ दिवस पाण्यापासून वंचित राहील आहे. याचा निषेध म्हणून गावातील ग्रामपंचायत सदस्या लता गोळे यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत कार्यालयासमोर शेकडो महिलांना घेऊन त्यांनी हंडा मोर्चा काढला.
कोरेगाव : कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील पाणीदार गाव म्हणून परिचित असलेले अरबवाडी गाव सध्या ग्रामपंचायतीच्या नियोजन शून्य कारभारामुळे गेली आठ दिवस पाण्यापासून वंचित राहील आहे. याचा निषेध म्हणून गावातील ग्रामपंचायत सदस्या लता गोळे यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत कार्यालयासमोर शेकडो महिलांना घेऊन त्यांनी हंडा मोर्चा काढला.
या गावाने २०१८ साली टंचाई योजनेतून गावाशेजारील अरबवाडी तलावातून गावांसाठी पाणीपुरवठा करण्यासाठी विहिरी पर्यंत पाईपलाईन टाकण्यात आली होती. ग्रामपंचायतीने डागडुजी करून ती यंत्रणा पुन्हा सुरू केली. पण नवीन पंपात बिघाड झाल्याने १३ नोव्हेंबरपासून १८ नोव्हेंबरपर्यंत गावात पाणीपुरवठा झाला नाही. याचा जाब विचारण्यासाठी ग्रामपंचायत सदस्या लता गोळे यांच्या नेतृवाखाली हंडा मोर्च्याचे आयोजन केले होते. गावातील महिलांनी या माेर्चात आपला सहभाग नोंदवला.
[blockquote content=”गावापासून अगदी जवळ अरबवाडी तलाव आहे. या तलावात सध्या राखीव पाणीसाठा उपलब्ध आहे. असे असताना पाणी पुरवठा करणारी मोटर आठ दिवस बंद राहिल्याने गावास पाणी पुरवठा होऊ शकला नाही याला संबधित ग्रामपंचायत सरपंच आणि ग्रामसेवक जबाबदार आहेत.” pic=”” name=”- तानाजी गोळे, ग्रामस्थ अरबवाडी”]
Web Title: There is water in arabwadi lake and drought situation in the village nrdm