इतिहास संशोधक इंद्रजीत सावंतांना धमकी मिळाल्याने खळबळ; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश
इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. प्रशांत कोरटकर यांच्या नावाने इंद्रजीत सावंत यांना फोन आला होता. इंद्रजीत सावंत यांना धमकीचा फोन आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. धमकी प्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी इंद्रजीत सावंत यांचा जबाब नोंदवला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणाची दखल घेत पोलिसांना चौकशीचे आदेश दिले आहेत.
धमकीचा फोन आल्यानंतर कोल्हापूर पोलीस आज इंद्रजीत सावंत यांच्या घरी आले होते. पोलिसांनी धमकीचं कॉल रेकॉर्डिंगही ऐकलं, त्याशिवाय इंद्रजीत सावंत यांचा जबाब नोंदवला. प्रशांत कोरटकर यांच्या नावाने धमकी आली होती, असे सावंत यांनी सांगितले. याप्रकरणी कोल्हापूर पोलिसांकडून कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. मात्र इंद्रजीत सावंत यांनी केलेले आरोप प्रशांत कोरटकर यांनी फेटाळले आहेत.
या कॉल रेकॉर्डींगमध्ये “जिथं असाल तिथे येऊन ब्राह्मणांची ताकद दाखवू, तुम्ही कितीही मराठे एकत्र करा”, असं म्हणत धमकी देण्यात आली आहे. या व्यक्तीने सावंत यांना शिवीगाळही केली आहे. या व्यक्तीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत देखील अवमानकारक वक्तव्य केल्याचा दावा सावंत यांनी केला आहे. या कॉल रेकॉर्डिंगमध्ये संबंधित व्यक्तीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नावाचाही उल्लेख केला आहे. सध्या हे कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
निरपराध तरुणाला मारहाण प्रकरण; पोलिसांनी गजा मारणेवर थेट मोक्का लावला अन्…
इंद्रजीत सावंत हे इतिहास अभ्यासक आहेत. ते सातत्याने समाज माध्यमात इतिहासातील घडामोडींबाबत भूमिका मांडत असतात. नुकतंच छावा चित्रपट आल्यानंतर त्यांनी आपली भूमिका मांडली होती. त्यानंतर आता त्यांना ही धमकी देण्यात आली आहे.