पुणे : अल्पवयीन मुलगी घरात एकटी असल्याचे पाहून तिघांनी घरात घुसून शिवीगाळ केली. तसेच तुझ्यावर बलात्कार करेन अशी धमकी देऊन विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी दोन महिलांसह तिघांवर पोक्सो अॅक्टनुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
याबाबत १५ वर्षीय पिडीत अल्पवयीन मुलीने रविवारी (दि १९) चतु;श्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. यानुसार सुरेखा कोमरेकर, काजल अलकुंटे, प्रदीप बाबू अलकुंटे (तिघे रा. जनवाडी जनता वसाहत) यांच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, १४ मे रोजी सायंकाळी साडेसात वाजता पिडीत मुलगी घरात एकटी होती. त्यावेळी आरोपी फिर्य़ादी यांच्या घरात आले. त्यांनी मुलीला अश्लील शिवीगाळ केली. तर आरोपी प्रदीप याने घराच्या खिडकीतून हात घालून मुलीचा हात पकडला. तिच्यासोबत अश्लिल वर्तन करुन बलात्कार करण्याची धमकी दिल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. पुढील तपास सहायक निरीक्षक सुजाता शानमे करीत आहेत.